नागपूर : दरवर्षीप्रमाणे नवीन नंदनवन ले-आऊट येथे हभप साहेबराव राऊत व रजनी राऊत यांच्या मार्गदर्शनात शिवालयातून पांडुरंगाच्या पालखीसह काकडा आरती व दिंडीला सुरुवात झाली. टाळ, वीणा, मृदुंगाच्या गजरात भाविक सहभागी झाले. डॉ. मोहन राऊत, डॉ. प्रिया राऊत यांनी पांडुरंगाचे प्रथम पूजन केले. याप्रसंगी भीमराव तितरमारे, कृष्णराव समर्थ, विनोद रयसे, कैलास तडस, संतोश धुर्वे, डॉ. दिवाकर भोयर, अरुण गाडगे, पुंडलिक जगताप, प्रेमराज बांडेबुचे, गोविंदा तिजारे, राहुल लांजेवार, नीता समर्थ, संतोष ठवकर, राजेंद्र काटे आदी सहभागी झाले होते. भाविकांनी कोरोनाचे संकट त्वरित दूर करण्यासाठी साकडे घातले.
न्यू नंदनवन येथे काकडा आरती व पालखी सोहळ्याचे समापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST