शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

नागपुरातील हॉटेल्ससह १४ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 20:58 IST

उपराजधानीतील अनेक हॉटेल्स, बार व इमारती या धोकादायक असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सुरूअसलेल्या निरीक्षणात पुढे आली आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाची ११३९ इमारतींना नोटीस : २०३ बार व रेस्टारंटचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील अनेक हॉटेल्स, बार व इमारती या धोकादायक असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सुरूअसलेल्या निरीक्षणात पुढे आली आहे. आतापर्यंत १६१३ इमारतींचे निरीक्षण करण्यात आले आहे. यापैकी ५५३ इमारती धोकादायक असून, ५८६ इमारतींमधील वीज व पाणीपुरवठा खंंडित करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहे. यातील १४ हॉटेल्स , बारचा पाणी वा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकात खळबळ उडाली आहे.सुरक्षेच्या दृष्टीने १५ मीटरपेक्षा उंच असलेल्या इमारतींमध्ये अग्निशमन उपाययोजना असणे बंधनकारक आहे. अशी अग्निशमन यंत्रणा नसलेल्या इमारती धोकादायक आहेत. धक्कादायक बाब म्हणजे धोकादायक इमारतीत शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांचाही समावेश आहे. अशा धोकादायक इमारतींमध्ये आग लागल्यास येथील लोकांचा जीवही धोक्यात येऊ शकतो, अशी शक्यता अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न करता व्यवसाय करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. नोटीस बजावण्यात आलेल्यापैकी ४५ इमारतधारकांनी आग नियंत्रक उपाययोजना केलेल्या आहे.स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराची लोकसंख्या ३५ लाख आहे. शहरालगतच्या भागातही मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. विकासासोबतच शहरालगत मोठे उद्योग उभे राहात असल्याने या भागातील लोकसंख्याही वाढत आहे. उभ्या राहात असलेल्या नवीन इमारती प्रामुख्याने १५ मीटरहून अधिक उंचीच्या वा बहुमजली आहेत. अशा इमारतींना अग्निसुरक्षा अधिनियमानुसार अग्निशमन उपाययोजना बंधनकारक आहे. परंतु अनेक विकासक वा बिल्डर्सने पळवाटा शोधत ही यंत्रणा इमारतींमध्ये बसविलेली नाही. त्यामुळे मोठी आग लागल्यास इथल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरात अशा ५५३ इमारती धोकादायक असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाºयांनी दिली.वीज, पाणीपुरवठा बंद केलेले हॉटेल्स व इमारतीहॉटेल गोमती (पारडी), हॉटेल साहिद लॉजिंग व बोर्डींग (मोमीनपुरा),हॉटेल पाराडीस (सीए रोड), विश्रांती लॉज, हॉटेल कॉम्प्लेक्स (सीएरोड), नाफिस गेस्ट हाऊ स (मोमीनपुरा),हॉटेल अली मुस्तकीम (मोमीनपुरा), ताजश्री लॉजिंग व बोर्डींग (हंसापुरी), अलीया कॉम्प्लेक्स (गांधीबाग),सम्राट गेस्ट हाऊ स (सीए रोड ),विमल मोती निवास (टिमकी), सेव्हन सूट रुम अ‍ॅन्ड रेस्टारंट (अभ्यंकरनगर),एस.आर.कॅफे अ‍ॅन्ड स्मोकिंग (अभ्यंकरनगर),अमरजित रिसोर्ट प्रा.लि. एअरपोर्ट सेंटर पॉर्इंट (वर्धा रोड)

 

टॅग्स :hotelहॉटेलNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका