शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटायझेशनचा कागदोपत्री सोपस्कार बंद करा : महापौर संदीप जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:19 IST

कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता सर्वत्र थातूरमातूर फॉगिंग आणि सॅनिटायझेशन केले जात आहे. हा कागदोपत्री सोपस्कार तात्काळ बंद करा, अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला खडसावले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता सॅनिटायझेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सर्वत्र फवारणी होणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून दररोजच फवारणीची प्रसिद्धी केली जाते. मात्र रोजच लोकप्रतिनिधींना नागरिकांकडून फवारणीबाबत तक्रारी केल्या जातात. शहरातील अनेक भागात अद्यापही योग्य प्रकारे फॉगिंग आणि सॅनिटायझेशन करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत प्रशासनाद्वारे दररोज फॉगिंग आणि सॅनिटायझेशनचा दावा केला जात आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता सर्वत्र थातूरमातूर फॉगिंग आणि सॅनिटायझेशन केले जात आहे. हा कागदोपत्री सोपस्कार तात्काळ बंद करा, अशा शब्दात महापौरसंदीप जोशी यांनी प्रशासनाला खडसावले.यासंबंधी संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नुकतेच एक कार्यालयीन पत्र सोपविले आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार, शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक भागात सॅनिटायझेशन तसेच डासांच्या वाढत्या संख्येमुळे नियमित फॉगिंग करण्यात यावी. याकरिता मागील सात दिवसांपूर्वीच मनपा प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. मात्र याबाबत आवश्यक तशी कार्यवाही करण्यात आली नाही, असा प्रश्न संदीप जोशी यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.फॉगिंग आणि सॅनिटायझेशनचे महत्त्व लक्षात घेऊन कठोर निर्णय गरजेचे आहेत. मात्र महापौर वा स्थायी समिती अध्यक्ष यांना विश्वासात न घेता आयुक्त स्वत: निर्णय घेत आहेत. नगरसेवकांना विश्वासात न घेता काहीतरी करायचे या उद्देशाने केवळ कागदोपत्री सोपस्कार करीत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.नगरसेवकांच्या मागणीनुसार सॅनिटायझेशनसॅनिटायझेशन करण्यासाठी मुख्यालयातून अग्निशमन विभागाच्या गाड्या पाठविल्या जातात. झोन स्तरावर अधिकारी व नगरसेवक याचे नियोजन करतात. त्यानुसार सॅनिटायझेशन वा फॉगिंग केले जाते. याचे श्रेय घेण्याची चढाओढ काही नगरसेवकांमध्ये दिसून येत आहे. हा प्रसंग पुढाकार घेण्याचा आहे, श्रेय घेण्याचा नसल्याची चर्चा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौर