शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सोनोग्राफी केंद्र तात्काळ बंद करा

By admin | Updated: June 21, 2017 02:26 IST

इंदोरा डाक कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील निवासी इमारतीत फ्लॅट क्रमांक १०१ व १०२ मध्ये अनुमती न घेता

महापौरांचे आदेश : दोषी अधिकाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदोरा डाक कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील निवासी इमारतीत फ्लॅट क्रमांक १०१ व १०२ मध्ये अनुमती न घेता सुरू असलेले अवैध सोनोग्राफी व फिजिओ थेरेपी केंद्र तात्काळ बंद क रा, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिले. तसेच या प्रकरणात दोषींच्या विरोधात कारवाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. धर्मपाल मेश्राम यांनी प्र्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणात गेल्या तीन वर्षांपासून आसीनगर झोनकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. नगररचना विभागाने अवैध सोनोग्राफी केंद्राला नोटीस बजावली होती. परंतु झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांनी कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली नाही. या प्रकरणात संबंधिताना केवळ नोटीस बजावण्यात आली. या मुद्यावर माजी महापौर प्रवीण दटके व माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी तसेच सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचा आग्रह त्यांनी धरला. उपराजधानीला स्मार्ट बनविण्यासाठी सकारात्मक निर्णय उपराजधानीला स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व रस्ते अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याला महापालिका प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. बंटी शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. दुबे यांच्या नियुक्तीची चौकशी निगम सचिव हरीश दुबे यांची नियुक्त, त्यांना २१ वर्षांपूर्वी गं्रथालय पदावर देण्यात आलेली पदोन्नती, तसेच सेवानिवृत्त झालेले कर्मचारी एस.के. पानतावणे यांना डावलण्यात आल्याचा मुद्दा काँग्रेसचे संदीप सहारे यांनी उपस्थित केला. याची दखल घेत सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दुबे यांची नियुक्ती व पदोन्नती प्रकरणाची आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्याची सूचना केली. महापौरांनी त्यानुसार निर्देश दिले. ६३ कुटुंबांच्या वारसांना मिळणार काम मृत ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या ६३ कुटुंबीयांनी अनुकंपाच्या आधारावर नियुक्ती व्हावी, यासाठी अर्ज केलेले आहेत. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. या संदर्भात आयुक्तांनी निर्णय घ्यावा. संबंधित कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला ऐवजदाराचे काम द्यावे, अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली. या कुटुंबीयांची अवस्था बिक ट असल्याचा मुद्दा काँग्रेसचे सदस्य मनोज सांगोळे यांनी उपस्थित केला होता. आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करून वारसांना नोकरी देण्याची सूचना महापौरांनी केली. बस क र्मचाऱ्यांना किमान वेतन महापालिकेची आपली बस सेवा सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यामुळे महापालिकेचे १२ ते १३ लाखांचे नुकसान झाले. याची आॅपरेटरकडून भरपाई करण्यात यावी. तसेच बस कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार किमान वेतनच्या आधारे वेतन देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य प्रफुल्ल गुडधे यांनी केली. नुकसानभरपाई कंत्राटदारांवर निश्चित करण्यात यावी. तसेच नियमानुसार कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची सूचना सत्ताधाऱ्यांनी केली. महापौरांनी ही सूचना मान्य केली.