शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाचा वार्षिक ‘फार्स’ बंद करा, आशिष देशमुख यांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:08 IST

नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता आ. आशिष देशमुख यांनी सरकारला ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे.

नागपूर : नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता आ. आशिष देशमुख यांनी सरकारला ‘टार्गेट’ करणे सुरू केले आहे. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कालाव२धीवरून दुसरा ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. नागपूर कराराचा सन्मान करत हिवाळी अधिवेशन सहा आठवड्यांचे करावे. अन्यथा नागपूर अधिवेशनाचा वार्षिक ‘फार्स’ तरी बंद करावा, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यापूर्वी नागपूर ही मध्यप्रांताची राजधानी होती. राजधानी मुंबई होणार असल्यामुळे इकडचे प्रश्न सोडवण्यात अडचणी येतील हे ओळखून तत्कालीन नेत्यांनी नागपूर करार केला. त्यानुसार हे अधिवेशन सुरू झाले आहे. परंतु या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न सुटत नाहीत. विदर्भाच्या विकासासाठी भाजपची असलेली प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे अधिवेशन किमान सहा आठवडे चालविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.या मागणीची दखल घेतली जाणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घ्यावासभागृहातील गोंधळ आणि सभागृहाबाहेरचे मोर्चे यातून जनतेचे मूळ प्रश्न सुटत नाहीत. जर सभागृह दीड महिना चालले तर नक्कीच विदर्भाच्या हिताचे निर्णय होतील. दीर्घकाळ अधिवेशन चालणे विदर्भाच्या हिताचे आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील जाणतात. त्यामुळे त्यांनीच यासंदर्भात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७