शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नीचतेचा कळस! उपराजधानीत भुकेने व्याकूळ तरुणीवर बळजबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 08:30 IST

Nagpur News भुकेने व्याकूळ तरुणीवर एका नराधमाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर विरोध केला असता तिच्यावर चाकूने हल्ला केला. पोलीस ऐनवेळी पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देताजाबाद परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भुकेने व्याकूळ तरुणीवर एका नराधमाने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर विरोध केला असता तिच्यावर चाकूने हल्ला केला. पोलीस ऐनवेळी पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना सक्करदरा येथील सिंधीबन येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. (Forced on a starving young woman in Nagpur)

असलम ऊर्फ कल्लू जऊर खान (४५) असे आरोपीचे नाव आहे. तो ताजाबाद परिसरात खेळणी विकतो. पीडित २० वर्षीय तरुणी छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील रहिवासी आहे. ती मंगळवारी आपल्या एका मैत्रिणीसह बसने नागपूरला पोहोचली. त्या दोघीही भुकेने व्याकूळ हाेत्या. पैसे नसल्याने त्यांनी लोकांकडे मदत मागितली. काही लोकांनी त्यांना ताजाबादला जाण्याचा सल्ला दिला.

दोघी रात्री १२ वाजता ताजाबादला पोहोचल्या. तिथे कल्लूची तिच्यावर नजर गेली. त्याने त्या दोघींनी जेवणासह काम व राहण्याची जागा देण्याचे आमिष दाखविले व आपल्यासोबत घरी नेले. रात्री १ वाजता कल्लू एका तरुणीसोबत बळजबरी करू लागला. धोका ओळखून तरुणीची मैत्रीण पळण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा कल्लूने तिच्यावर चाकूने वार करून जखमी केले. जखमी अवस्थेतही ती तरुणी पळाली. परिसरात फिरत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांची तिच्यावर नजर गेली. पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला.

दरम्यान, कल्लूने ज्या तरुणीला बंधक बनवले होते तीसुद्धा पळून गेली. पोलिसांनी तरुणीच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क केला आणि तिला शोधून काढले. यानंतर कल्लूच्या घरी जाऊन त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध छेडखानी, मारहाण, धमकावणे आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी