शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मानवी चेहऱ्यापलिकडील संवेदनांचे क्लिक : इसा मोस्त्राचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 21:19 IST

बोलके भाव एका क्लिकमध्ये टिपणे खरतर छायाचित्रकारांचे कसब म्हणावे. पण काही ‘क्लिक’ इतके बोलके असतात की त्यातून चेहऱ्यावरील भावनाच नाही तर भावनांपलिकडे व्यक्तीच्या जीवनाचे गूढ रहस्यही उलगडून जातात.

ठळक मुद्देदर्डा आर्ट गॅलरीत आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी चेहऱ्यांवरील भाव अनेक अर्थाने बोलके असतात. हे बोलके भाव एका क्लिकमध्ये टिपणे खरतर छायाचित्रकारांचे कसब म्हणावे. पण काही ‘क्लिक’ इतके बोलके असतात की त्यातून चेहऱ्यावरील भावनाच नाही तर भावनांपलिकडे व्यक्तीच्या जीवनाचे गूढ रहस्यही उलगडून जातात. कधी ते एका क्षणात सापडतात तर कधी तो एक क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांना बराच काळ वाट पहावी लागते. यातूनच त्या छायाचित्रकारामधले कौशल्य दिसून येते. अशा कौशल्यपूर्ण छायाचित्रकारांचे संवेदना उलगडणारे छायाचित्र प्रदर्शन रसिकांचे व तरुण छायाचित्रकारांचे लक्ष वेधून घेत आहे.हे दोन दिवसीय स्पर्धा व प्रदर्शन लोकमत भवन स्थिती जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे लावण्यात आले आहे. इसा मोस्त्राच्यावतीने लागलेल्या या पोर्ट्रेटच्या (व्यक्तिचित्र) आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे शनिवारी प्रसिद्ध छायाचित्रकार ललित विकमशी व किशोर मसराम यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजनातील अनुराग भट्टाचार्य, राजस वैद्य, मिहिर भट्टाचार्य, चेतना बोरकर, डॉ. अमित दत्ता व राधे ढोलके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ललित विकमशी म्हणाले, फोटोग्राफी आणि पेंटिंग एकाच स्तराच्या कला आहेत. तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफीच्या कौशल्यात बराच फरक पडला आहे, मात्र शेवटी कलात्मकतेला महत्त्व असते. व्यक्तिचित्रात चेहरा व शरीराच्या भागांचे बोलके चित्रण असते. पण या चेहऱ्यावरील भावनांपलिकडे असलेली कथा त्या एका क्लिकमध्ये उलगडली की ते चित्र श्रेष्ठ ठरते. छायाचित्रकारांनी या कथा शोधाव्या आणि त्यांच्या छायाचित्रांमधून मांडाव्या, असे आवाहन त्यांनी केले.इसा मोस्त्राच्या या छायाचित्र प्रदर्शनात भारतासह स्पेन, बल्गेरिया, ओमान, रियाद आदी देशातील छायाचित्रकारांच्या ११८ छायाचित्रांचा समावेश आहे. डॉ. दत्ता यांनी सांगितले, प्रदर्शनासाठी ४०० पेक्षा अधिक प्रवेशिका आल्या होत्या, त्यापैकी ७८ छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला. परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार बांगलादेशचे जीएमबी आकाश यांनी सर्वोत्तम छायाचित्रांची निवड केली आहे. प्रदर्शनांतर्गत शनिवारी सकाळी फोटो मॅरेथॉन घेण्यात आली. यामध्ये ४० उदयोन्मुख छायाचित्रकारांनी रस्त्यावर पोर्ट्रेट काढले. या पोर्ट्रेटचाही प्रदर्शनात समावेश करण्यात आल्याचे डॉ. दत्ता यांनी सांगितले. हे प्रदर्शन अनेक अर्थाने बोलके आहे. मानवी चेहऱ्यांमधून अनेक भाषा, धर्म व संस्कृती व विविधतेने नटलेल्या भारताचे, येथील सण उत्सवांचे, माणसांचे, पारंपरिकतेचे आणि आधुनिकतेसोबत येथील वेदना व संवेदनांचेही दर्शन प्रदर्शनातून होते, जे नव्या कलावंतांसाठी व रसिकांसाठीही अतुलनीय आहे.

टॅग्स :Jawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीnagpurनागपूर