शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

नागपूर शहरातील २३९ नाल्यांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 20:59 IST

शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्याला गेल्या महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. शहरात २३९ नाले असून २३ जूनपर्यंत शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचेंबरची सफाई अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्याला गेल्या महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. शहरात २३९ नाले असून २३ जूनपर्यंत शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता व्हावी, यासाठी दहा झोनमध्ये ७८ छोटे जेसीबी, पोकलेन व टिप्पर तसेच १६१ कामगार उपलब्ध करण्यात आले होते. नाले स्वच्छ झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात नाले तुंबण्याचा धोका कमी झाला आहे. नाल्याच्या काठावरील वस्त्यात पुराचे पाणी शिरणार नाही, असा विश्वास आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. सुनील कांबळे यांनी व्यक्त केला.सुरुवातीला नाले स्वच्छतेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता होईल की नाही, अशी शंका व्यक्त के ली जात होती. परंतु यंदा मान्सून लांबल्याने स्वच्छतेसाठी अवधी मिळाला. त्यामुळे नाले स्वच्छ करणे शक्य झाले.शहरात एकूण २३९ नाले आहेत. गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक ५१ नाले आहेत. सर्वांत कमी १४ नाले हनुमाननगर झोनमध्ये आहेत. शहरातील तीन नद्यांचे पाणी अतिवृष्टीमुळे शहरात शिरू नये, यासाठी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सोबतच नाले स्वच्छतेलाही सुरुवात करण्यात आली होती. बहुसंख्य नाले हे वस्त्यांना लागून असल्याने व नाल्यांचे पात्र अरुंद असल्याने तासाभराच्या पावसातही ते तुडुंब भरून वाहतात. वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका असतो. यामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. अनेक वस्त्यांमधील नाल्यांच्या चेम्बरमधून सिवर लाईन जोडल्यामुळे नाले दुथडी भरून वाहतात. यामुळे नाल्यांसोबत चेम्बरचीही स्वच्छता करण्यात येते. शहरात एकूण १६ हजार ३३८ चेम्बर्स आहेत. त्यापैकी १५ हजार ९६६ चेम्बर्सची स्वच्छता झाली आहे. अद्याप १७७ चेम्बर्सची स्वच्छता शिल्लक आहे.नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळ व यंत्र या दोन्ही माध्यमातून करण्यात आली. अरुंद नाल्यांची स्वच्छता महापालिके च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली. तर मोठ्या नाल्यांची स्वच्छता छोटे पोकलॅण्ड उतरवून करण्यात आली. नाल्यांतील पाणी शहरातील तीनही नद्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नद्यांसोबतच नाल्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी महत्त्वाची ठरते. तीन वर्षांपूर्वी शहरातील दोन झोनमध्ये नाल्यात काही जण वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.झोननिहाय नाल्यांची संख्यालक्ष्मीनगर २२धरमपेठ ३५हनुमाननगर १४धंतोली १८नेहरूनगर १५गांधीबाग ५१सतरंजीपुरा २२लकडगंज १५आसीनगर १८मंगळवारी २९एकूण २३९

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNaag Riverनाग नदी