शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ केवळ घोषणाच? नागपूर रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांकडून नियमांची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 10:31 IST

भाजपाच्या नेत्यांकडून नियमांचे पालन, ‘स्वच्छ भारत’ यासंदर्भात मोठमोठे बौद्धिक देण्यात येते. विविध कार्यक्रम आयोजित करून त्याचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आज अजनी रेल्वेस्थानकात दिसून आले.

ठळक मुद्देसर्रासपणे ओलांडत होते रेल्वे रुळअजनी रेल्वे स्टेशन की कचरा घर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाच्या नेत्यांकडून नियमांचे पालन, ‘स्वच्छ भारत’ यासंदर्भात मोठमोठे बौद्धिक देण्यात येते. विविध कार्यक्रम आयोजित करून त्याचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येतो. परंतु प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असल्याचे चित्र आज अजनी रेल्वेस्थानकात दिसून आले. ‘सोशल मीडिया’वर ‘बौद्धिक’ देण्यात आघाडीवर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भारतीय रेल्वे

च्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आमदार, वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समोर हा प्रकार सुरू असताना कुणीही त्यांना थांबविण्याची तसदीदेखील घेतली नाही. सकाळी ८.१५ वाजता नियोजित रेल्वेगाडी निघून गेल्यामुळे मुंबई येथे पक्षाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला जाणारे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते पाच तासांहून अधिक वेळ अजनी रेल्वेस्थानकावर अडकून पडले होते. या कालावधीत कार्यकर्त्यांकडून शिस्तीची अपेक्षा होती. परंतु साधे कचरापेटीत कचरा टाकण्याचे सौजन्यदेखील काही कार्यकर्त्यांनी दाखविले नाही. रेल्वेकडून विविध माध्यमातून रेल्वेट्रॅक ओलांडणे नियमबाह्य आहे, याची जागृती करण्यात येते. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना साधा रेल्वेपूल ओलांडून जाणे जीवावर येत होते व अनेक कार्यकर्ते थेट प्लॅटफॉर्मवरुन रेल्वेरुळावरच जाताना दिसून आले. एका प्लॅटफॉर्मवरुन दुसरीकडे पाण्याच्या पाऊचच्या पिशव्या पोहोचविताना तर पूर्ण ‘ट्रॅक’वर डझनाहून अधिक कार्यकर्त्यांनी शृंखलाच तयार केली होती.

‘आरपीएफ’च्या सूचनेकडे ‘भाजयुमो’ कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष४रेल्वेरुळ ओलांडणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना ‘आरपीएफ’तर्फे असे न करण्याची सूचना करण्यात आली. मात्र काही कार्यकर्त्यांनी ‘तुम अपना काम करो’ असे म्हणत या सूचनेकडे दुर्लक्ष केले. यावेळी ‘भाजयुमो’च्या शहर अध्यक्ष शिवानी दाणी यांनीदेखील याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांना नियम पाळण्याबाबत आग्रह केला नाही.प्लॅटफॉर्मवर कचराच कचरास्वच्छ भारत मोहिम देशभरात राबविण्यात येत असून नागपुरातदेखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यात पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्याकडून अजनी रेल्वेस्थानकावर प्रत्यक्षात कृती मात्र दिसून आली नाही. जागोजागी पिण्याच्या पाण्याचे पाऊच, चिप्स-बिस्किटांची रिकामी पाकिटे पडली होती. विशेष रेल्वेगाडीवर पक्षाचे स्टीकर्स व बॅनर्स लावण्यात आले होते. त्याचा कचरादेखील प्लॅटफॉमवरच फेकण्यात आला होता.

टॅग्स :BJP rally in Mumbaiभाजपाचा महामेळावा 2018