शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व कारंजे सुरू असल्याचा दावा : मनपाचा उघडपणे खोटारडेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:34 IST

शहराला सुंदर करण्यासाठी २०१६ पासून काही ठिकाणी कारंजे लावण्यात आले. परंतु त्यातील अनेक कारंजे बंद आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मनपाने सर्वच कारंजे सुरू असल्याचा माहितीच्या अधिकारात दावा केला आहे.

ठळक मुद्देकोटींचा निधी पाण्यात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ असे मोठमोठे दावे नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात येतात. मात्र कचरा रस्त्यांवर पडलेला असल्यामुळे स्वच्छतेच्या नावाने बोंब तर आहेच. दुसरीकडे सुंदर नागपूरसंदर्भातदेखील अनास्थाच दिसून येत आहे. शहराला सुंदर करण्यासाठी २०१६ पासून काही ठिकाणी कारंजे लावण्यात आले. परंतु त्यातील अनेक कारंजे बंद आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे मनपाने सर्वच कारंजे सुरू असल्याचा माहितीच्या अधिकारात दावा केला आहे. यामुळे मनपाचे अधिकारी शहराच्या सौंदर्यीकरणाबाबत खरोखरच किती गंभीर आहेत व वास्तविक परिस्थितीची किती जाण आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून मनपाचा खोटारडेपणाच उघड झाला आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे विचारणा केली होती. शहरात २०१६-१७ पासून पाण्याची किती कारंजे तयार करण्यात आले, यापैकी किती कारंजे बंद आहेत, कारंजे ‘मेन्टेन’ करण्यासाठी कंत्राटदारांना किती रक्कम देण्यात आली, तलावांतील कारंज्याची काय स्थिती आहे. मनपातर्फे मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१६-१७ या कालावधीत नागपुरात १३ ठिकाणी कारंजे बसविण्यात आले. यात सद्गुरु नगर उद्यान, महालक्ष्मी नगर, महात्मा फुले उद्यान, जगन्नाथ स्वामी मंदिराजवळ, शारदा चौकातील हनुमान मंदिराजवळ, गांधीबाग उद्यान, गांधीसागर तलाव, दर्शन कॉलनी उद्यान, शनिवारी क्वॉर्टर्स, रामपेठ, बडकस चौक, विवेकानंद स्मारक येथील कारंज्यांचा समावेश आहे. ‘लोकमत’ने या ठिकाणांची पाहणी केली असता बऱ्याच ठिकाणी कारंजे सुरूच नसल्याची बाब समोर आली. कारंजे बसविण्यासाठी ९५ लाख ७४ हजार ७६४ रुपये खर्च करण्यात आले तर कारंजांच्या देखरेखीसाठी व दुरुस्तीसाठी २०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीत १४ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु जर कारंजे दुरुस्त झाले तर मग अनेक कारंजे बंद का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तलावांतील कारंजे बंदशहरातील फुटाळा तलाव व गांधीसागर तलाव येथे गाजावाजा करुन कारंजे लावण्यात आले होते. मात्र हे दोन्ही कारंजे बंदच असल्याचे दिसून आले. मनपाने हे दोन्ही कारंजे बंद असल्याचे माहिती अधिकारात नमूद केले आहे, मात्र याचे नेमके कारण मात्र स्पष्ट केलेले नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका