शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी विशेष सुविधा निर्माण केल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:58 IST

पोस्टमास्टर जनरल, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वत:च्या अख्त्यारितील इमारतींमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला.

ठळक मुद्देहायकोर्ट : पोस्टमास्टर जनरल, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोस्टमास्टर जनरल, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वत:च्या अख्त्यारितील इमारतींमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला.प्रतिज्ञापत्रांनुसार शहरातील सात डाक कार्यालयांमध्ये पोर्टेबल रॅम्प व हॅन्डरेल बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी ३ लाख ३१ हजार ३८५ रुपये मंजूर झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ट्रॅक टाईल्स पाथ, रॅम्प व ग्रॅब बार बसविण्यात आले आहेत. तसेच, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयांत रॅम्प व स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. मनपाच्या दहाही झोन कार्यालयांत रॅम्प, हॅन्डरेल्स, व्हील चेयर्स, स्वतंत्र पार्किंग, स्वच्छतागृहे व लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य सार्वजनिक इमारतीमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.यासंदर्भात इंद्रधनू या सामाजिक संस्थेची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी तिन्ही विभागांची प्रतिज्ञापत्रे रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी बाजू मांडली.ही दुसरी जनहित याचिकासंस्थेने समान मुद्यावर दाखल केलेली ही दुसरी जनहित याचिका होय. शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या  पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही महानगरपालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने संस्थेची पहिली जनहित याचिका निकाली काढली होती. परंतु, महानगरपालिकेने ग्वाहीचे पालन केले नाही. परिणामी संस्थेने दुसऱ्यांदा न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर