शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई देण्याचा दावा फोल ! लक्ष्मीपूजन आले तरी केवळ ३० टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा

By आनंद डेकाटे | Updated: October 20, 2025 20:12 IST

३०,८२९ शेतकऱ्यांचा खात्यात निधी जमा : ११२ कोटी आले, ३२.३३ कोटींचे वितरण :

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळी पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. परंतु सोमवारपर्यंत प्रत्यक्षात ३०,८२९ शेतकऱ्यांचा खात्यात नुकसानीचा निधी जमा झाला आहे. एकूण शेतकऱ्यांपैकी ३० टक्केच शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला. यामुळे दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा खात्यात निधी जमा होण्याचा सरकारचा दावाही फोल ठरल्याचे दिसते. दुसरीकडे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपर्यंत इतर शेतकऱ्यांच्या खात्यातही निधी जमा होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

दिवाळीचा उत्सव शुक्रवार वसुबारसपासून सुरू झाला. असे असतानाही सरकारकडून दिवाळी पूर्वीच निधी देण्यार असल्याचे सांगण्यात येते होते. सरकारच्या लेखी लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी उत्सव असल्याची टीका शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रत्यक्षात लक्ष्मीपूजन पूर्वीही सर्व शेतकऱ्यांना नुकसानाची मदत मिळाली नाही.

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याची घोषणा केली होती. नागपूर जिल्ह्यात १,०३,८७१ शेतकरी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झाले असून ८७,१६९ हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. यांना मदतीसाठी ११४. ६४ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाने ११२ कोटींचा निधी वितरित केला. २० तारखेपर्यंत ३० हजार ८२९ शेतकऱ्यांच्या खात्यात ३२ कोटी ३३ लाख ४५ हजार ७४० रुपये जमा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. एकुण शेतकऱ्यांच्या फक्त ३० टक्केच शेतकऱ्यांना मदत मिळाली.

सरकारने प्रस्ताव केला परत

सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून शासनाच्या निकषानुसार मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव तीन हेक्टरनुसार होता. परंतु शासनाला दोन हेक्टरच्या मर्यादेतील प्रस्ताव व त्यावरील हेक्टरचा असे दोन स्वतंत्र मागणीचे प्रस्ताव हवे होते. त्यामुळे एकदा शासनाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळेही मदतीस विलंब झाल्याचे समजते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers' Diwali Compensation Promise Fails; Only 30% Receive Funds

Web Summary : Government's promise to deposit compensation before Diwali falters. Only 30% of farmers in Nagpur district received funds for crop damage due to heavy rains. The delay is partly attributed to the government requesting revised proposals, hindering timely aid disbursement.
टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीGovernmentसरकार