शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रती दिवस दोन हजार रुपये दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 01:20 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या ५ मेपासून प्रती दिवस २००० रुपये दावा खर्च बसवला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बँकेला हा दणका दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणका : गत ५ मेपासून द्यावी लागेल रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या ५ मेपासून प्रती दिवस २००० रुपये दावा खर्च बसवला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बँकेला हा दणका दिला.आधी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके त जमा केले जात होते. कर्मचाऱ्यांनी या बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते त्यांच्या वेतन खात्यातून कापून घेतले जात होते. २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणल्यानंतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यात जमा करणे सुरू झाले. दरम्यान, जिल्हा बँकेच्या पत्रावरून बँक आॅफ बडोदाने खाते गोठविल्यामुळे शिक्षक नारायण मालखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या कारवाईमुळे त्यांना खात्यातील रक्कम काढता येत नव्हती. जिल्हा बँकेचे कर्ज सुलभ हप्त्यांमध्ये परत करण्याची त्यांची तयारी होती. परिणामी, उच्च न्यायालयाने ६ एप्रिल २०१८ रोजी मालखेडे यांना यासंदर्भात दोन आठवड्यात जिल्हा बँकेकडे निवेदन सादर करण्यास सांगितले व जिल्हा बँकेला त्यांच्या निवेदनावर पुढील दोन आठवड्यात निर्णय घेण्याचा आदेश दिला. त्या आदेशाचे बँकेने पालन केले नाही. परिणामी, मालखेडे यांनी दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता जिल्हा बँकेला ६ एप्रिल २०१८ रोजीच्या आदेशाचे पालन करावे लागेल असे स्पष्ट केले व निवेदनावर निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे बँकेला प्रती दिवस २००० रुपये दावाखर्च अदा करण्यास सांगितले. तसेच, बडोदा बँकेला मालखेडे यांचे खाते जप्तीमुक्त करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. संदीप नंदेश्वर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयbankबँक