- मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे रक्तदान शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमतने राबविलेल्या राज्यस्तरीय रक्तसंकलन ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेत शहरातील रंगकर्मींनीही स्वेच्छेने सहभाग नोंदवत, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात कलावंत कधीच मागे नसतात, हे सिद्ध केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्यावतीने रेशीमबाग चौक येथील संत गुलाब बाबा सेवाश्रम येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आ. प्रवीण दटके, नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे व मध्यवर्तीचे अध्यक्ष नरेश गडेकर यांच्या हस्ते पार पडले. लेखन, दिग्दर्शन, अभिनय व बॅकस्टेजमध्ये काम करून आपल्या अदायगीने रसिकांचे भरभरून मनोरंजन करणारे कलावंत सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्याच शृंखलेत रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात रंगकर्मी बहुसंख्येने सहभागी झाले. यावेळी आसावरी तिडके, प्रमोद भुसारी, दिलीप ठाणेकर, देवेंद्र लुटे, चारुदत्त जिचकार, रवींद्र भुसारी, लोकेश तांदुळकर, नितीन पात्रीकर, राकेश खाडे, प्रशांत मंगदे, आप्पा मोहिते, अरुण तिडके, हेमंत मुढाणकर, किशोर डाऊ, महेश रायपूरकर, अभय अंजीकर, वीरेंद्र लाटणकर, प्रवीण देशकर, शिल्पा शाहिर, रोशन नंदवंशी, विलास कुबडे, किशोर बत्तासे, विजय मोटघरे, मुश्ताक शेख, एजाज शेख, नाना मिसाळ, प्रशांत खडसे, चैतन्य डुबे, संकेत गडेकर, सुनील हिरेखण, अश्विन वाघाले, विजय गुमगांवकर, नितीन प्रचंड, मनीष मोहरिल, शोभना मोहरील, रोहिणी मोहरील, समाप्ती देशकर, मुग्धा देशकर, अतुल देशमुख, निधी मोहिते उपस्थित होते.
..........................