शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रुग्णालय तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

मेहा शर्मा नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही दिवसात देशाच्या विविध भागासोबतच महाराष्ट्रात डेल्टा ...

मेहा शर्मा

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही दिवसात देशाच्या विविध भागासोबतच महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरीएन्टचे २२ रुग्ण आढळले आहेत. उपचाराच्या दृष्टीने नागपूर महत्वपूर्ण ठरले आहे.

तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असताना ‘लोकमत’ने नागपूर शहरातील रुग्णालय कितपत तयार आहेत याची पडताळणी केली. याबाबत महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मुलांसाठी पाचपावली, केटीनगर, इंदिरा गांधी रुग्णालयात १०० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. पाचपावलीत ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान शहरात दररोज ७ हजारापेक्षा अधिक टेस्ट झाल्या. टेस्ट नियमित करण्यात येत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय इमारतीत २०० बेडचे नवे रुग्णालय तयार करावे हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी जिनोम टेस्टिंगचा तपासणी अहवाल मिळण्यात उशीर होत असल्यामुळे उपचारावर पडणाऱ्या परिणामाबाबत सांगितले की, उपचार प्रभावित होत नाही. परंतु संक्रमणाचा प्रसार नियंत्रित करण्यात अडचणी येतात. ते दररोज १५ नमुने तपासणीसाठी पाठवित आहेत. नीरीनेही जिनोम टेस्टिंग सेंटर सुरु केले आहे. लवकरच शहरात ही टेस्टिंग करणारी एक संस्था सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीच्या तयारीबाबत ते म्हणाले की, पायाभूत सुविधांसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये ९०० बेड आहेत. मेयोत ५०० बेड आहेत. महापालिका व खासगी रुग्णालय वेगळी व्यवस्था करीत आहेत. आम्ही अतिशय चांगली तयारी केली आहे. आता सर्व पुढील परिस्थितीवर अवलंबून आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, नीरीत जिनोम टेस्टींग सुरु करण्यात आली आहे. नव्या व्हेरीएन्टमुळे प्रकरणे वाढू शकतात. त्याचा कठोरपणे सामना करण्यात येईल. नव्या व्हेरीएन्टमुळे अधिक मृत्यू होतील याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला. मेडिकलमध्ये १ हजारापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. तिसऱ्या लाटेतही रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. जिनोम टेस्टींगवर नीरीचे संचालक डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितले की, नीरीने सिक्वेसिंग सुरु केली आहे. सीसीएमबी हैदराबादसोबत मिळुन ९० टक्के काम येथे करण्यात येत आहे. नीरीला विशेष स्ट्रक्चर व आवश्यक डाटाची गरज आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने मनुष्यबळाची गरज भासणार आहे. मूळ म्हणजे ही पर्यावरण प्रयोगशाळा आहे. येथे सर्व प्रकारची कामे होऊ शकत नाहीत.

...............