शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

‘शाईफेक’वर कारवाईसाठी शहर काँग्रेसचे ‘चलो दिल्ली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:17 IST

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पूर्व नागपुरातील प्रचार सभेत प्रदेशाध्याक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी कट रचण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेस मुख्यालयासमोर करणार शंखनाद : नवरात्रीनंतरचा मुहूर्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात पूर्व नागपुरातील प्रचार सभेत प्रदेशाध्याक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. पक्षाचे उमेदवार पाडण्यासाठी कट रचण्यात आले. नगरसेवकांना पक्षविरोधी भूमिका घेण्यास भाग पाडण्यात आले. यामागे पक्षातील काही नेत्यांचा असून त्यांच्याविरोधात अ.भा. काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटीकडे तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ नवरात्रीनंतर दिल्ली येथे धडक देऊन अ.भा. काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयासमोर शंखनाद करण्याचा व बैठा सत्याग्राह करणार आहे.काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी देवडिया भवनात नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाºयांनी पक्षविरोधी कारवाया करणाºयांवर कारवाई करण्यात होत असलेल्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. पक्षातील काही नेते भाजपाशी हातमिळवणी करून शहरात पक्ष कमजोर करू पाहत आहेत. अशा नेत्यांचे पुरावे सादर केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई होत नाही. यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे मनोबल खचत आहे, असा सूर व्यक्त करण्यात आला. शहर काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने दिल्ली गाठून ज्येष्ठ नेत्यांना पक्षविरोधी कारवायांचे प्रकार निदर्शनास आणून द्यावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.बैठकीत अ‍ॅड. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, बंडोपंत टेंभूर्णे, राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, जयंत लुटे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, रेखा बाराहाते, धरम पाटील, विलास भालेकर, वीणा बेलगे आदींनीही पक्ष बळकटीसाठी भूमिका मांडली. यावेळी रत्नाकर जयपूरकर, महेश श्रीवास, डॉ. मनोहर तांबुलकर, चंद्रकांत बडगे, नितीश ग्वालबन्सी, विक्रम पनकुले, विवेक निकोसे, वासुदेव ढोके, ईश्वर बरडे, संजय झाडे, संजय सरायकर, अरविंद वानखेडे, किरण गडकरी, हरीश ग्वालबन्सी, पंकज थोरात आदी उपस्थित होते.काँग्रेस नेते घालताहेत ‘वाड्यावर’ लोटांगणकाँग्रेसचे काही नेते युएलसी घोटाळा, बँक घोटाळा, शिक्षण संस्थामधील गैरप्रकारात अडकले आहेत. आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून हे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘वाड्यावर’ लोटांगण घालत आहेत. हे नेते भाजपाच्या इशाºयावर काँग्रेस तोडण्याचे काम करीत आहेत, असा आरोप विकास ठाकरे यांच्यासह पदाधिकाºयांनी बैठकीत केला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यावर शाई फेकण्याचा कट कुणी रचला, ‘वाड्यावर’ कोण जातो, गडकरींच्या गाडीत कोण फिरतो, कुणाच्या शिक्षण संस्थेला गडकरींच्या खात्याकडून कोट्यवधीचे काम मिळाले आहे, याचे पुरावे, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सोपविले जाईल, असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले.