शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व दुरुस्ती; मनपात अभिनंदन प्रस्तावावर विरोधक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:40 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.

ठळक मुद्देसभागृहात गोंधळ : विरोधकांचा सभात्याग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध केला. या विरोधाला न जुमानता भाजप नगरसेवकांनी हा प्रस्ताव मांडल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रस्तावाला जोरदार विरोध करून सभात्याग केला.सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच आरोग्य सभापती वीरेंद कुकरेजा यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावर तानाजी वनवे व प्रफुल्ल गुडधे यांनी आक्षेप घेतला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत असताना या प्रस्तावावर अभिनंदन प्रस्ताव आणणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. यावर माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी काँग्रेस नगरसेवकांचा आक्षेप तथ्यहीन असल्याची भूमिका घेतली. परंतु विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावरुन सभागृहात गोंधळ वाढला. भाजपचे ज्येष्ठ नगसेवक दयाशंकर तिवारी यांनी सत्तापक्षाच्या प्रस्तावाचे समर्थन करीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अनेक लोक न्यायालयात गेले आहेत. अभिनंदन प्रस्ताव हा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासंदर्भात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. काश्मीर मधील कलम ३७० हटविल्याने तेथे शांतता आहे. त्यामुळे अभिनंदन प्रस्तावाला विरोध चुकीचा असल्याची भूमिका मांडली. विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. मात्र काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे व हरीश ग्वालबंशी सभागृहात बसून होते. यामुळे सभागृहात उलटसुलट चर्चा होती.सर्वत्र विरोध अन् अभिनंदन कसले?कें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभरात तीव्र आंदोलने होत असताना या निर्णयावर अभिनंदन कसले, असा सवाल विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी केला. हा प्रस्ताव सभागृहात मांडण्याची गरज नव्हती, अशी भूमिका त्यांनी मांडली.कायदा केला म्हणून अभिनंदन दुर्दैवीकें द्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सभागृहात अभिनंदन प्रस्ताव आणणे दुर्दैवी आहे. या कायद्याला देशभरात नागरिक विरोध करीत आहेत. सभागृहात यापूर्वी एखादा कायदा केला म्हणून अभिनंदन प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे चुकीची परंपरा पाडली जात आहे.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका