शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपुरात नागरिकांचा आक्रोश अन् गोंधळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:30 IST

सतरंजीपुरा झोनमधील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रभागात फिरत नाही. महापालिका, नासुप्र व एसएनडीएलकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींच्या आश्रयात नासुप्रच्या जागेवर अनधिकृत प्लॉट पाडून ते विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दूषित पाणी व पाणीटंचाईच्या मुद्यावरून नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात सोमवारी आक्रोश करून गोंधळ घातला. संतप्त नागरिकांनी व्यासपीठाजवळ गर्दी केल्याने पोलिसांनी त्यांना आवरले.

ठळक मुद्देजनसंवाद कार्यक्रमात नगरसेवक व प्रशासनावर व्यक्त केला रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा झोनमधील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रभागात फिरत नाही. महापालिका, नासुप्र व एसएनडीएलकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींच्या आश्रयात नासुप्रच्या जागेवर अनधिकृत प्लॉट पाडून ते विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दूषित पाणी व पाणीटंचाईच्या मुद्यावरून नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात सोमवारी आक्रोश करून गोंधळ घातला. संतप्त नागरिकांनी व्यासपीठाजवळ गर्दी केल्याने पोलिसांनी त्यांना आवरले. 

कन्हान जलशुद्धीकरण केंद्राला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने दोन पंप बंद आहेत. परिणामी शहरातील काही वस्त्यांना कमी पाणीपुरवठा होत आहे. शाहूनगर, बिनाकी मंगळवारी, नाईक तलाव, बांगलादेश यासह अनेक वस्त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिक ांनी केली तसेच नळाला दूषित पाणी येत असल्याचे सांगितले.नगरसेवकाची होणार होती पूजानगरसेवक संजय चावरे यांच्या प्रभागात दर्शनही होत नसल्याची तक्रार रजनी मोहाडीकर यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी केली. वॉर्डातील समस्या सुटत नसल्याने नगरसेवकाची पूजा करण्यासाठ़ी मोहाडीकर या महिलेने पूजेचे ताटही सोबत आणले होते. पूजेचे ताट घेऊन ही नगरसेविका व्यासपीठावर चढणार तोच पोलिसांनी तिला आवरले. पाण्याची लाईन, गडरलाईन आणि रस्ते अशा तीन तक्रारी घेऊन ही महिला जनसंवाद कार्यक्रमात आली होती. प्रभागातील नागरिकांनीही नगरसेवकांच्या विरोधात रोष व्यक्त केला.हलबांना शासनाचे संरक्षणचहलबांना शासनाने संरक्षण दिले आहे. तसे शासनाचे परिपत्रक निघाले आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राकेश बोरीकर या व्यक्तीने शासनाने हलबांसाठी काहीच केले नाही, असा आरोप केला होता. नगरसेवक रमेश पुणेकर यांनीही हा आरोप केला. त्यावर पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शासनाने हलबा समाजाच्या एकाही व्यक्तीला नोकरीवरून काढले नाही. जात प्रमाणपत्राबाबतचे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे न्यायालयाच्या निकालापर्यंत थांबावे लागणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर शासन गंभीर असलयाचे पालकमंत्र्यांनी सांगितले.ट्रंकलाईन जीर्ण, वस्त्यात घाण पाणीनाईकतलावात मनपाने गडर लाईनचे पाणी सोडल्याची तक्रारही करण्यात आली. याच दरम्यान नगरसेविका आभा पांडे यांनी आपल्या प्रभाागातील चकना चौक येथील ट्रंकलाईन ही इंग्रजांच्या काळातील असून ती अत्यंत जीर्ण झाली आहे. ती बदलणे गरजेचे आहे. घाण पाणी लोकांच्या घरात शिरत आहे. जीर्ण गडर लाईनमुळे वॉर्डात अनेक ठिकाणी आपोआप खड्डे पडत असल्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. या कामासाठी आपण अनेकदा आयुक्तांना भेटलो असल्याचेही त्या म्हणाल्या.नासुप्रच्या जागेतील प्लॉटची अवैध विक्रीनासुप्रच्या शांतीनगर येथील एक एकर जागेवर कब्जा करून स्थानिक आमदार व व माजी नगरसेकाने प्लॉटची विक्री करून नागरिकांची फसणूक केल्याची तक्रार मारवाडी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जनसंवाद कार्यक्रमात केली. यासंदर्भात चौकशी करून प्लॉटची विक्री बेकायदेशीर असेल तर त रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांना दिले.

 

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीnagpurनागपूर