शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील नवनाथनगर, राखुंडेनगरचे नागरिक वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 20:18 IST

नवनाथनगर, राखुंडेनगर या वस्त्या ग्रामपंचायत बहादुराअंतर्गत येत असून, या वसाहती गेल्या १५ वर्षांपासून विकासापासून वंचित आहेत. या वस्त्या नागपूर शहर व ग्रामपंचायतमधील पांदण रस्त्याच्या बाजूला वसल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदाऱ्या ढकलत आहेत. परिणामी नागरिक समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देमनपा व ग्रामपंचायत दोघांनीही नाकारली जबाबदारी : सोयीसुविधांअभावी नागरिकांना भेडसावताहेत समस्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नवनाथनगर, राखुंडेनगर या वस्त्या ग्रामपंचायत बहादुराअंतर्गत येत असून, या वसाहती गेल्या १५ वर्षांपासून विकासापासून वंचित आहेत. या वस्त्या नागपूर शहर व ग्रामपंचायतमधील पांदण रस्त्याच्या बाजूला वसल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदाऱ्या ढकलत आहेत. परिणामी नागरिक समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.नासुप्रने रस्त्यालगतच्या भूखंडधारकांना रिलिज लेटर दिले आहे. यात रस्ता ४० फुटांचा दर्शविण्यात आला आहे. प्रस्तावित रस्त्याच्या बाजूला गडरलाईनचे टाके आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहात असल्याने नागरिकांना जाणे-येणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात संपूर्ण वसाहतीला तलावाचे रूप येते. घराघरात पाणी शिरते. त्यामुळे लोकांना संसर्गजन्य आजार होण्याची भीती आहे. वसाहतीत अंतर्गत रस्ते नसल्यामुळे चांगलीच फजिती होत आहे. रस्त्याच्या बाबतीत वस्तीतील नागरिकांनी संघर्ष समिती स्थापन करून, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांना वेळोवेळी निवेदन दिले.विशेष म्हणजे तत्कालीन पालकमंत्र्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता ग्रामपंचायतीला आदेश दिले. परंतु त्यांच्या आदेशालाही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. मनपाच्या अखत्यारित असलेला ४० फूट रुंदीचा रस्ता करण्याबाबत निवेदन दिले. परंतु हा रस्ता आमच्या अधिकारात येत नसल्याने मनपाच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. दोन्ही यंत्रणांनी हात वर केल्याने रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या