शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या मुलींवरील बलात्कारामुळे नागरिक संतप्त : लकडगंज ठाण्यावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:24 IST

मिनीमातानगर येथे चार व सहा वर्षाच्या चिमुकली मुलींवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गुरुवारी संतप्त नागरिकांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत लकडगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पीडितांना न्याय देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिनीमातानगर येथे चार व सहा वर्षाच्या चिमुकली मुलींवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. गुरुवारी संतप्त नागरिकांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत लकडगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पीडितांना न्याय देण्याची मागणी केली.मिनीमातानगर येथील रेल्वे लाईनजवळ एका निर्जन ठिकाणी नराधम आरोपीने या मुलींना चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला आणि पळून गेला. हातात कपडे घेऊन दोन्ही मुली रस्त्यावर भटकतांना आढळून आल्या. एका मजुराने त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. पोलिसांनी आरोपीला रात्री अटक केली. परंतु नागरिकांचा राग शांत झाला नाही. त्यांनी गुरुवारी दुपारी मोर्चा काढला. मोर्चात सहभागी नागरिक आरोपीचा प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवून चालत होते. मोर्चात सर्वच पक्षाचे नेते सहभागी होते. मनपा स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेविका चेतना टांक, नगरसेवक अनिल गेंड्रे, राष्ट्रवादीचे नगरसेवक दुनेश्वर पेठे, काँग्रेसचे अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, शिवसेनेचे रविनीश पांंडे आदी सहभागी झाले होते. मिनीमातानगर येथून काढण्यात आलेल्या या मोर्चात सदन सोनवणे, यश जैन, पिंकी वर्मा, सतनामी समाजाचे अध्यक्ष महेंद्र बघेल, धीरेंद्र मार्कंडेय, संदीप कोसरे, कृष्णा खुटेल, हेमंत कुर्रे, भागवत मंडले, सविता देशलहरे, दुलेश्वरी सूर्यवंशी, संगीता पाटील, सीता गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील महिला पुरुष सहभागी झाले होते. हा मोर्चा लकडगंज पोलीस ठाण्यावर पोहोचला तेव्हा परिस्थिती अतिशय तणावपूर्ण झाली होती. कारण तेव्हा आरोपी पोलिसांच्या कोठडीत होता. पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर कारवाईचे आश्वान दिल्यावरच लोक शांत झाले.आरोपीला फाशी द्यादोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याशिवाय पीडित चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पूर्व नागपुरातील मिनीमातानगर, डिप्टी सिग्नल, कळमना आदी परिसरात अवैध धंदे रोखणे, गस्त वाढवणे अशी मागणी करणारे निवेदनही सादर करण्यात आले.

टॅग्स :Rapeबलात्कारMorchaमोर्चा