शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

विदर्भातील ११ जिल्ह्यांना सिकलसेलचा विळखा

By admin | Updated: August 10, 2016 00:45 IST

विदर्भात ‘मॉजेले’ची गरज; अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये प्रादुर्भाव जास्त.

अकोला, दि. 0९:: जीवघेण्या सिकलसेल आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृतीसह प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. तसे होत नसल्यामुळे सिकलसेल रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये दीड लाखापेक्षा अधिक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आहे. रुग्ण संख्येला आळा घालून आजाराचे अचूक निदान करण्यासाठी विदर्भात ह्यमॉजेलेह्ण( मॉलिक्युलर जेनेटीक लेबॉरेटरी)स्थापन करण्याची नितांत गरज आहे.संतान उत्पत्तीच्या माध्यमातून सिकलसेल आजाराचा फैलाव होतो. अतिदुर्गम भागात राहणार्‍या नागरिकांमध्ये या आजाराचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नंदूरबार, यवतमाळसह ११ जिल्ह्यांमध्ये सिकलसेल आजाराचे दीड लाख रुग्ण आहेत. आजाराला आळा घालण्यासाठी लग्नापूर्वी तरुण-तरुणींमध्ये जागृती-समुपदेशन करणे, रक्ताच्या चाचण्या करणे व ज्या महिलांनी सिकलसेलग्रस्त बालकांना जन्म दिला त्यांचे योग्यरीत्या लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सक्षम असणे अपेक्षित आहे. सिकलसेलचा प्रसार होऊ नये, यासाठी जनजागरण प्रभावी माध्यम आहे. संबंधित रुग्णाला वर्षातून किमान तीन ते चार वेळेस रुग्णालयात भरती व्हावे लागते. उपचारासाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. रुग्णाच्या जन्मापासून ते त्याच्या अंतापर्यंत हा प्रवास सुरू असल्यामुळे संबंधित कुटुंबीयांना मार्गदर्शनासह शासनाच्या उपाययोजनांची गरज आहे. २00८ ते २0१४ कालावधीत तत्कालीन केंद्र सरकारने राज्य शासनाला १0९ कोटी रुपये दिले होते. या निधीची योग्यरीत्या अंमलबजावणी न झाल्यामुळे रुग्णांना अद्यापही सुविधा मिळत नसल्याची परिस्थिती आहे.विदर्भात ह्यमॉजेलेह्णची गरजराज्यात सिकलसेलचा सर्वाधिक प्रभाव विदर्भातील ११ जिल्ह्यांत आहे. देशातील २0 पैकी चार ह्यमॉजेलेह्ण सिकलसेल अस्तित्वात नसलेल्या पुणे,मुंबई शहरासाठी प्रत्येकी दोन मंजूर झाले. शिवाय सिकलसेलचे मुख्यालय मुंबईत आहे. दुर्गम भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो. आजाराला आळा घालण्यासाठी जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे. रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे.-संपत रामटेके, अध्यक्ष सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर.