शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
4
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
5
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
6
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
7
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
8
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
9
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
10
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
11
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
12
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
13
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
14
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
15
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
17
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
18
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
19
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
20
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख

धक्कादायक! नागपूरमध्ये भरदिवसा पाठलाग करून ठार मारलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 19:10 IST

कार चालकाचा पाठलाग करून अमरावती मार्गावरील चार ते पाच आरोपींनी कार चालकाची हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :अमरावती मार्गावर कारचा पाठलाग करून भर  सिग्नलवर चार ते पाच आरोपींनी कार चालकाची पिस्तुलातून गोळी झाडून तसेच घातक शास्त्राची घालून  हत्या केली. आज दुपारी ४ च्या सुमारास बोले पेट्रोल पंपाजवळ ही सिनेस्टाईल घटना घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मृतकाचे नाव बाल्या बिनेकर असून त्याचे गोळीबार चौकात सावजी रेस्टॉरंट आहे. कुख्यात गुन्हेगार म्हणून बाल्याची ओळख होती. त्याच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न, जुगार तसेच दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी वर्तुळात बाल्याचे अनेक शत्रू आहेत. बाल्या आज त्याच्या आलिशान कारने अमरावती मार्गाने जात असताना बुलेट तसेच एक्टिवावर आलेल्या चार ते पाच गुन्हेगारांनी त्याचा पाठलाग केला. बोले पेट्रोल पंपाजवळच्या सिग्नलवर कार थांबताच बाल्याला कारची काच खाली करण्यास भाग पाडले आणि त्याच्यावर देशी पिस्तूलातून फायर केला.

 

कट्टा जाम झाल्यामुळे आरोपींनी घातक शस्त्रांचे घालून बाल्याची त्याच्या कारमध्येच निर्घृण हत्या केली. अत्यंत वर्दळीच्या मार्गावर भर सिग्नलवर ही घटना घडली त्यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. आरोपी पळाल्यानंतर एकाने नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सीताबर्डी पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर सीताबर्डीचा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनीही घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचे नाव स्पष्ट झाले नव्हते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत होते.

टॅग्स :Murderखून