शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिगरेटच्या तुकड्याने सिद्ध केला खून; पतीची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 18:29 IST

Nagpur News चंद्रपूर जिल्ह्यातील एका खून प्रकरणामध्ये घटनास्थळी सापडलेला सिगारेटचा तुकडा महत्त्वपूर्ण पुरावा ठरला. त्या तुकड्यावरील अर्काचा डीएनए व आरोपीचा डीएनए सारखा आढळला. त्यामुळे आरोपी घटनास्थळी उपस्थित होता हे स्पष्ट झाले.

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एका खून प्रकरणामध्ये घटनास्थळी सापडलेला सिगारेटचा तुकडा महत्त्वपूर्ण पुरावा ठरला. त्या तुकड्यावरील अर्काचा डीएनए व आरोपीचा डीएनए सारखा आढळला. त्यामुळे आरोपी घटनास्थळी उपस्थित होता हे स्पष्ट झाले.

(A cigarette butt proved murder; Husband's life sentence for wife's murder remains)

आरोपीने तो घटनास्थळी उपस्थित नव्हता असा दावा केला होता, पण त्याने स्वत: पिलेल्या सिगारेटच्या तुकड्यानेच त्याला खोटे ठरवले.रमेश सदाशीव जावळे (६१) असे आरोपीचे नाव असून तो बल्लारशा येथील रहिवासी आहे. त्याने पत्नीचा खून केला आहे. घटनेचा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. घटना घडली त्यावेळी घरी उपस्थित नव्हतो, नागपूरला गेलो होतो, असा बचाव जावळेने केला होता. परंतु, हा बचाव त्याला वाचवू शकला नाही.

 

पोलिसांना घटनास्थळी सिगारेटचा तुकडा मिळून आला होता. त्या तुकड्यावरील अर्काचा डीएनए व आरोपीचा डीएनए सारखा आढळला. याशिवाय, आरोपीच्या कपड्यांवरील व खुनासाठी वापरलेल्या लाकडी काठीवरील रक्ताचा डीएनए आणि मृताचा डीएनए समान आढळला. तसेच घटनेच्या दिवशी रात्री शेजाऱ्यांनी आरोपीला घरी पाहिले होते. या सर्व बाबींवरून आरोपीनेच पत्नीचा खून केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जावळेची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ११ मे २०१८ रोजी सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावल्यानंतर जावळेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील फेटाळण्यात आले.हेतूही सिद्ध झालामृताचे नाव सविता होते. आरोपीने तिचा खून करण्यामागील हेतूही सिद्ध झाला. आरोपीचे विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून त्याचे पत्नीसोबत नेहमी भांडण होत होते. याशिवाय आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. त्यातून त्याने १० जून २०१५ रोजी पत्नीचा खून केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHigh Courtउच्च न्यायालय