शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बाळाच्या चोरीचा तपास सीआयडी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 20:07 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेल्या नवजात बाळा (मुलगी)च्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेल्या नवजात बाळा (मुलगी)च्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. चोरी गेलेल्या बाळाची आई दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. तिला तपास सुरू असल्याचे सांगत परत पाठविले जाते. सत्तार यांनी सांगितले की, रुग्णालयात सीसीटीव्ही लागले आहेत. परंतु घटनेच्या वेळी सीसीटीव्ही बंद होते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या वेळी सीसीटीव्ही बंद असल्याची कबुली दिली. मुलीच्या आईजवळ एक बुरखा घातलेली महिला आली. दोघींनी खून वेळ गोष्टी केल्या. त्यानंतर मुलीकडे लक्ष ठेवण्यास सांगून मुलीची आई वॉशरुममध्ये गेली. यादरम्यान ती महिला नवजात बाळाला घेऊन पळाली. महिलेने बुरखा घातला असल्याने तिची ओळख पटू शकली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. परंतु आ. सत्तार यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करून ते नेहमी सुरू राहतील, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस