शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

नाताळाच्या सुट्यात पर्यटनाची धूम!

By admin | Updated: December 26, 2015 03:48 IST

सध्या नाताळाच्या सुट्या सुरू असून, यात अनेकांनी छोट्यामोठ्या सहलीच्या योजना आखल्या आहेत.

जंगल पर्यटनाला पसंती : व्याघ्र प्रकल्प, उद्याने, अभयारण्य गजबजलीनागपूर : सध्या नाताळाच्या सुट्या सुरू असून, यात अनेकांनी छोट्यामोठ्या सहलीच्या योजना आखल्या आहेत. यातून जिकडे-तिकडे पर्यटनाची धूम दिसून येत आहे. यामुळे नागपूरशेजारची सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली आहेत. मागील दोन दिवसांपासून जवळपास सर्वच शाळांना नाताळाच्या सुट्या लागल्या आहेत. शिवाय शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागोपाठ चार दिवसांच्या सुट्या मिळाल्या आहेत. ही संधी साधून अनेक परिवार नाताळाच्या सुट्यांसह पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटत आहे. यामुळे नागपूरच्या सभोवतालची ऐतिहासिक पर्यटन स्थळे, व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, धार्मिक स्थळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजली आहेत. यात जंगल पर्यटनाला प्रथम पसंती दिली जात आहे. त्यामुळे सर्व जंगल पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह पेंच, नवेगाव-नागझिरा, कोका, बोर व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. माहिती सूत्रानुसार महा इको टुरिझमच्या वेबसाईटवर पर्यटकांची मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. मागील काही वर्षांत पर्यटकांचे जंगलाकडे विशेष आकर्षण वाढले आहे. शिवाय वन विभाग सुद्धा पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे. याशिवाय ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांवरही गर्दी दिसून येत आहे. नागपूरपासून काहीच अंतरावर असलेले रामटेक येथील ६०० वर्षे जुने प्राचीन राममंदिर, पारडसिंगा येथील अनसूया माता मंदिर, आदासा येथील गणपती मंदिर, धापेवाडा, नगरधनचा किल्ला व वर्धा जिल्ह्यात पवनार पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. (प्रतिनिधी)