शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

ख्रिसमस काळातील रेल्वेगाड्या फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 20:47 IST

ख्रिसमसला मुलांना शाळेतून सुट्या मिळतात. त्यामुळे बहुतांश पालक मुलांच्या सुट्या पाहून बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करतात. मात्र, २५ ते ३१ डिसेंबर या काळातील रेल्वेगाड्यांमधील बर्थची स्थिती पाहता जवळपास सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे.

ठळक मुद्देवेटिंगची स्थिती : प्रवासाचे प्लॅनिंग करणाऱ्यांची निराशा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ख्रिसमसला मुलांना शाळेतून सुट्या मिळतात. त्यामुळे बहुतांश पालक मुलांच्या सुट्या पाहून बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करतात. मात्र, २५ ते ३१ डिसेंबर या काळातील रेल्वेगाड्यांमधील बर्थची स्थिती पाहता जवळपास सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे. यामुळे ख्रिसमसच्या सुट्यात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची निराशा होत आहे.ख्रिसमसच्या काळातील रेल्वेगाड्यांमधील वेटिंगचा आढावा घेतला असता जवळपास सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे. यात मुंबईकडे जाणाऱ्या १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस स्लिपर ४४ ते १६०, थर्ड एसी ३७ वेटींग आहे. पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यात १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस स्लिपर १०९ ते १३२, थर्ड एसी ८३ वेटिंग, १२८४९ बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस स्लिपर २५, थर्ड एसी ३१ वेटिंग, १२१३० बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस स्लिपर ६३ ते ८८, थर्ड एसी ८५ वेटिंग, १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ स्लिपर १२६ ते १९४, थर्ड एसी १२७ वेटिंग, उत्तरेकडील गाड्यात १२६२५ केरळ एक्स्प्रेस स्लिपर ११८ ते १९५, थर्ड एसी ९१ वेटिंग, चेन्नईकडील गाड्यात १२६१६ जीटी एक्स्प्रेस स्लिपर १९, थर्ड एसी २९वेटिंग, १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेस स्लिपर क्लास आरएसी १५०, थर्ड एसी २२ वेटिंग, १२५११ राप्तीसागर एक्स्प्रेस स्लिपर क्लास २९ वेटिंग, थर्ड एसी १६ वेटिंग, १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेस स्लिपर क्लास ३४ ते १४६ वेटिंग, थर्ड एसी ५४ वेटिंग, १२६५२ संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये वेटिंग २५ आहे. त्यामुळे क्रिसमसच्या काळातील रेल्वेगाडीचे आरक्षण करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. यामुळे प्रवाशांची निराशा होत असून त्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागणार आहे.दलालांनी तिकिटे घेतल्याची शंकादिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात दलालांनी तिकिटे काढून ते ज्यादा दराने प्रवाशांना विकल्याची बाब उजेडात आली होती. दलालांनी केवळ तिकिटेच पुरविली नाही, तर प्रवाशांना बनावट आधारकार्डचा पुरवठाही केल्याचे आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईत स्पष्ट झाले होते. त्यामुळे ख्रिसमसच्या काळातही दलालांनी तिकिटे काढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ख्रिसमसच्या काळातही विशेष पथकाकडून तपासणी‘ख्रिसमसच्या काळातील रेल्वेगाड्यांमध्ये विशेष पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. यात दलालांकडून तिकीट खरेदी केले असल्यास संबंधित प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी