शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

भाजीविक्रेत्यावर फेकले ‘तिखट’; पत्रकार आणि महिला पोलिसांनी दाखवले प्रसंगावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:31 IST

भाजीविक्रेत्यावर तिखट पावडर फेकून त्याची रक्कम लुटू पाहणाऱ्या एका गुन्हेगारावर पत्रकार आणि पोलिसांनी झडप घातली. त्यांच्या डोळ्यात तिखट फेकून गुन्हेगार पळून गेला.

ठळक मुद्देरक्कम लुटण्याचा प्रयत्नचोरटा हाती लागला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवडी बाजारात भाजी विकणाऱ्याची रक्कम लुटण्याच्या इराद्याने चोराने आपले काम तर केले पण झाले उलटेच.. भाजीविक्रेत्यावर तिखट पावडर फेकून त्याची रक्कम लुटू पाहणाऱ्या एका गुन्हेगारावर पत्रकार आणि पोलिसांनी झडप घातली. त्यांच्या डोळ्यात तिखट फेकून गुन्हेगार पळून गेला. सोमवारी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाजीबाजारात ही घटना घडली. त्यामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.

आयुर्वेद कॉलेजजवळ मोठा भाजीबाजार भरतो. सायंकाळी तेथे मोठी गर्दी असते. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी भाजीबाजारात गजबज होती. अचानक एका भाजीविक्रेत्याच्या दुकानात एक गुन्हेगार आला आणि त्याने त्याच्या डोळ्यात तिखट फेकून त्याची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे ज्येष्ठ पत्रकार राजेश्वर मिश्रा भाजी घेत होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवून त्या गुन्हेगाराची गचांडी पकडली. त्यामुळे आरोपीने त्याच्या हातातील तिखटपूड मिश्रा यांच्याही तोंडावर फेकली आणि तेथून पळ काढला.

या घटनेमुळे ग्राहकांनी आरडाओरड केली. ती ऐकून बाजूला असलेल्या दामिनी पथकातील दोन महिला पोलीस कर्मचारी तिकडे धावल्या. त्यांनी आरोपीचा पाठलाग केला; मात्र मैदानाच्या बाजूला असलेल्या झाडीतून आरोपी बिंझानी कॉलेजकडे पळून गेला. या घटनेमुळे भाजीबाजारात काही वेळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, तिखट हल्ल्यामुळे भाजीविक्रेता आणि पत्रकार मिश्रा जखमी झाले. बाजारातील ग्राहकांनी पाण्याच्या बाटल्या देऊन त्यांची मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी