शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

व्हिडिओ गेम सोडून मुले वळली पारंपरिक खेळांकडे

By admin | Updated: May 14, 2014 00:48 IST

विद्यार्थ्यांंना आता उन्हाळ्याची सुटी लागली आहे. त्यात उन्हाचा पाराही वाढलेला. एरवी मुलांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट.

नागपूर : विद्यार्थ्यांंना आता उन्हाळ्याची सुटी लागली आहे. त्यात उन्हाचा पाराही वाढलेला. एरवी मुलांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. पण क्रिकेटसाठी मोठी जागाही लागते आणि उन्हात खेळण्यासाठी पालकांची ना असते. त्यानंतर मुलांजवळ एकच उपाय उरतो. व्हिडीओ गेम्स किंवा काटरून पाहण्याचा. पण काटरून्स आणि व्हिडीओ गेम्सही दिवसभर खेळता येत नाही. त्याने डोके जड होते, डोळ्यांना त्रास होतो. यंदा मात्र उन्हाळ्याच्या सुटीत मुले पारंपरिक खेळात रमली आहे. कंचे, विटीदांडूसारख्या खेळात मुलांचा समूह शहरातील विविध भागात दंग झालेला आहे.

साधारणत: घरोघरी संगणकाचे चलन वाढल्यानंतर मुलांना व्हिडीओ गेम्सने चांगलेच पछाडले. एक नवे माध्यम यामुळे खुले झाले आणि स्वाभाविकपणे ते मुलांना अपीलही झाले. पण सतत स्क्रिन समोर बसल्याने डोके जड होते. काही वेळाने डोळ्यांनाही त्रास होतो. त्यानंतर व्हिडीओ गेम्स खेळायची मुलांचीच इच्छा होत नाही. काटरून्स मुलांना अतिशय आवडतात. पण सातत्याने काटरून्स पाहिल्याने डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. कारण काटरून्समध्ये चित्र गतीने बदलतात आणि लहान मुलांचे डोळे प्रत्येक वेळी बदलणार्‍या चित्राप्रमाणे ‘अँडजेस्ट’ होत नाहीत. त्यामुळे सुजाण पालक अर्धा ते एक तासापेक्षा जास्त वेळ मुलांना काटरून्स पाहू देत नाही. सातत्याने संगणक आणि टीव्हीच्या स्क्रिनसमोर बसल्याने मुलांची विचार करण्याची, निर्णय घेण्याची वृत्ती संपते. त्यांच्यात चिडचिडेपणा आणि हिंसक वृत्ती निर्माण होण्याचा धोका असतो. पण मुलांना सुट्या लागलेल्या आणि अभ्यासाचा आनंदीआनंद. अशा वेळी मुलांना गुंतविण्यासाठी कॅरम, बुद्धिबळासारखे खेळ पालकांनी सुचविले आहेत. ‘गिल्ली टोला’ मारण्यासाठी मुलांना खुणावतो आहे. हा टोला जमला तर मुलांना ‘सिक्स’ मारल्याचाच आनंद होतो. सायंकाळी लगोरी खेळण्यात प्रामुख्याने मुली अग्रेसर असल्या तरी आता खेळ फक्त मुलींचाच राहिला नाही. यात मुलेही अनेक ठिकाणी सहभागी झाली आहेत. अर्थात यामुळे आत्मकेंद्री जगणार्‍या लोकांचाही परस्पर संवाद वाढला आहे. मुले टीव्हीच्या कोषातून बाहेर पडत आहेत आणि हे खेळ खेळण्यातला आनंद त्यांना खुणावतो आहे. ‘चंगा अष्टा’ हा खेळही शालेय विद्यार्थ्यांंना मजेशीर वाटतो आहे. काही ठिकाणी तर ‘नाव, गाव, वस्तू, प्राणी, पक्षी’ हा बुद्धीला ताण देणारा खेळही मुले खेळत आहेत. (प्रतिनिधी)

त्यात शहरातील अनेक ठिकाणी मुले कंचे, लगोरी, विटीदांडू, भोवरा, टिक्कर बिल्ला आदी खेळांकडे वळले आहेत. कॉलनीतल्या झाडाखाली, अपार्टमेन्टच्या सावलीत भर दुपारी मुलांचे खेळ रंगले आहेत तर सायंकाळच्या वेळी मुली दोरीवरच्या उड्या, टिक्कर बिल्लासारख्या पारंपरिक खेळात रमल्या आहेत. वस्त्यांमधील रस्त्यांवर सहज नजर टाकली तर टिक्कर बिल्ला खेळण्यासाठी आखलेले विटांच्या रंगांचे चौकोन दिसतात. कंचे खेळण्यात मुलांसोबत मुलीही आघाडीवर आहेत. त्यातला बद्दी, भस्सम, ढोपरण हे विस्मृतीत गेलेले शब्द पुन्हा कानावर पडत आहेत. त्यामुळे अनेकांना त्याची गंमतही वाटते आहे.

भोवर्‍याचेही विविध खेळ मुलांचे धम्माल मनोरंजन करीत आहेत. एरवी क्रिकेटच्या चेंडूनेच वस्तीतील घरांच्या खिडकीची तावदाने फुटायची. पण आता विटीदांडूनेही यात भर घातली आहे.

विटीदांडूंचा

उन्हाळ्यात साधारणत: १२ वाजेपर्यंंत सहज जागरण होते. त्यात मुलांना सुट्या लागलेल्या. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी रात्री बुद्धिबळाच्या पटात रंगलेले आहेत. चिमुकल्यांनी उद्यानात नेण्याचा हट्ट चालविला आहे. उद्यानातील खेळणी, घसरगुंडी, गोल फिरणारे खेळात चिमुकले हरविले आहेत. अर्थात त्यामुळेच सध्या उद्यानांमध्ये तुफान गर्दी वाढली आहे. त्यात