शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बाल न्याय कायद्यांतर्गत नातेवाइकाचेही अपत्य दत्तक घेता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:06 IST

Nagpur News बाल न्याय कायदा-२०१५ व त्यानुसार लागू दत्तक नियम-२०१७ अंतर्गत नातेवाइकाचेही अपत्य दत्तक घेता येते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बुधवारी दिला.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : बाल न्याय कायदा-२०१५ व त्यानुसार लागू दत्तक नियम-२०१७ अंतर्गत नातेवाइकाचेही अपत्य दत्तक घेता येते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बुधवारी दिला.

यवतमाळ जिल्हा न्यायालयाने सदर कायदा व नियमांतर्गत केवळ विधी संघर्षग्रस्त, काळजी व संरक्षण करण्याची गरज असलेले, अनाथ व पालकांनी सोडून दिलेले बालकेच दत्तक घेता येतात, अशी भूमिका घेऊन नातेवाइकाचे अपत्य दत्तक घेण्यासाठी दाखल अर्ज फेटाळला होता. नातेवाइकाचे अपत्य दत्तक घेण्याला सदर कायदा व नियमातील तरतुदी लागू होत नसल्याचे त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित पालकांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सदर कायदा व नियमातील तरतुदी तपासल्यानंतर यांतर्गतची दत्तक प्रक्रिया केवळ विधी संघर्षग्रस्त, काळजी व संरक्षण करण्याची गरज असलेले, अनाथ व पालकांनी सोडून दिलेल्या बालकांपुरती मर्यादित करू शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच, जिल्हा न्यायालयाने संबंधित पालकांचा अर्ज फेटाळायला नको होता, असे मत व्यक्त केले.

नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश

यवतमाळ येथील सुमेद व निशा ठमके या दाम्पत्याने त्यांचे वर्धा येथील नातेवाईक मनोज व राजश्री पाटील यांची अल्पवयीन मुलगी दत्तक घेतली आहे. याकरिता त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर नव्याने कायद्यानुसार निर्णय देण्यात यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला दिले. या प्रकरणात  ऍड . फिरदोस मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून तर,  ऍड . ईरा खिस्ती यांनी पालकांच्यावतीने बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय