शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरातील मुलीचा बालविवाह : ३० हजार रुपयात शेजाऱ्यांनी राजस्थानात विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:38 IST

उपराजधानीची गणना ही ‘स्मार्ट सिटी’मध्ये होत असून देशातील पुरोगामी शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र सर्व कायदे धाब्यावर बसवून शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री करण्यात आली आणि तिचा बालविवाह लावून देण्यात आला. संबंधित मुलगी कळमन्यातील असून शेजारच्या दोघांनी तिची ३० हजार रुपयात विक्री केली. पाच दिवसानंतर पीडित मुलीने तिच्या बहिणीला फोन केल्यानंतर या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा झाला. त्यानंतर कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सूत्रधार महिला आणि तिच्या मित्राला अटक केली आहे.

ठळक मुद्देमुलीने बहिणीला फोन केल्यावर प्रकार उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची गणना ही ‘स्मार्ट सिटी’मध्ये होत असून देशातील पुरोगामी शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र सर्व कायदे धाब्यावर बसवून शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री करण्यात आली आणि तिचा बालविवाह लावून देण्यात आला. संबंधित मुलगी कळमन्यातील असून शेजारच्या दोघांनी तिची ३० हजार रुपयात विक्री केली. पाच दिवसानंतर पीडित मुलीने तिच्या बहिणीला फोन केल्यानंतर या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा झाला. त्यानंतर कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सूत्रधार महिला आणि तिच्या मित्राला अटक केली आहे.सोनाली प्रल्हाद शाहू (वय २६) तसेच स्वप्निल नरेंद्र नंदेश्वर (वय २८), अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कळमन्याच्या चिखली वस्तीतील गजानन मंदिराजवळच्या झोपडपट्टीत राहतात. पीडित मुलीला आई नाही. दोन मोठ्या बहिणी आणि वडील आहेत. हे कुटुंबीय आरोपी सोनालीच्या शेजारी राहते. त्यामुळे मुलीसोबत सोनालीची चांगली ओळख होती. मुलगी काहीशी महत्त्वाकांक्षी असल्याचे हेरून सोनालीने तिच्याभोवती जाळे टाकले. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात राजवाडे असून, तेथे साधे घरकाम करणाºया महिला मुलींना हजारो रुपये पगार मिळतो, अशी थाप मारली. तेथे आपले मित्र, नातेवाईक आहे. तुला तेथे सहज नोकरी लावून देतो, असे सांगत चांगल्या जीवनाचे स्वप्न दाखवून सोनालीने मुलीचे मन राजस्थानला जाण्यासाठी वळविले. घरच्यांना हा प्रकार सांगितल्यास ते तुला जाऊ देणार नाही, असे सांगत राजस्थानच्या नोकरीचा विषय घरी काढू नको, असेही बजावले. सोनालीच्या भूलथापांना बळी पडून मुलीने तिच्यासोबत चलण्याची तयारी दाखविली. त्यानुसार, २६ नोव्हेंबरच्या रात्री १०. ३० वाजता मुलीला घेऊन आरोपी सोनाली शाहू आणि तिचा मित्र स्वप्निल नंदेश्वर नागपुरातून बाहेर पडले. २७ नोव्हेंबरला रात्री ते राजस्थानमध्ये होते. आधीच दलालाला सांगून ठेवल्यामुळे दलाल आणि मुलीला विकत घेणारे तयार होते. तेथे पोहचताच सोनाली आणि स्वप्निलने मुलीला दलालाच्या हवाली केले. बदल्यात त्याच्याकडून ३० हजार रुपये घेतले. कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून दलालाने या १४ वर्षांच्या मुलीसोबत पैसे देणाऱ्याचे लग्न लावून दिले. त्यानंतर सोनाली आणि स्वप्निल नागपुरात पळून आले.इकडे मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिचे वडील आणि बहिणी तिची शोधाशोध करीत होत्या.मुलीवर पाशवी अत्याचारमुलीला विकत घेऊन तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीने मुलीवर पाशवी अत्याचार सुरू केले. तिच्या वेदना दुर्लक्षित करून आरोपी तिला जनावरासारखे वागवू लागल्याने मुलगी हादरली. त्याच्या तावडीतून कशी सुटका करून घ्यावी, या विचारात असतानाच तिने तिला रविवारी रात्री संधी मिळाली. रविवारी रात्री ११ वाजता मुलीने आपल्या मोठ्या बहिणीच्या मोबाईलवर फोन करून तिला आपल्याला शेजारी राहणाऱ्या सोनाली आणि तिच्या मित्राने राजस्थानमधील बारा जिल्ह्यात आणून विकल्याचे सांगितले. येथे आपले लग्न एका मध्यमवयाच्या व्यक्तीशी लावून दिले असून, तो रात्रंदिवस आपल्यावर पाशवी अत्याचार करीत असल्याचेही सांगितले. मुलीने हा प्रकार वडिलांना सांगून रात्री पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. नियंत्रण कक्षातून कळमना पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी लगेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क करून त्यांना कळमना ठाण्यात आणले. पहाटे ५ पर्यंत त्यांच्याकडून माहिती मिळवल्यानंतर पीएसआय अनिल मेश्राम यांनी आरोपी सोनाली तसेच स्वप्निलविरुद्ध अपहरण करून तिची विक्री करण्याच्या आरोपाखाली कलम ३६३, ३६६, ३७० अन्वये गुन्हा दाखल केला.एकाला अटक, सोनालीची चौकशीप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रात्र झाल्यामुळे सोनालीला चौकशीत ठेवण्यात आले तर स्वप्निलला अटक करण्यात आली. सोनाली हीच या प्रकरणाची सूत्रधार आहे. तिने पतीसोबत काडीमोड घेऊन स्वप्निलसोबत मैत्री केल्याचेही तपासात पुढे आल्याचे पोलिसांकडून समजते. दरम्यान, तिने आणखी अशाप्रकारे किती महिला-मुली विकल्या, त्याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHuman Traffickingमानवी तस्करी