शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

उपराजधानीत बालमजुरांची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय; बारा-चौदा वर्षांच्या मुलांची तस्करी

By नरेश डोंगरे | Updated: January 15, 2025 00:04 IST

परप्रांतिय बालकांना राबविले जात आहे नागपुरात

नरेश डोंगरेनागपूर : बारा-चवदा वर्षांच्या मुलांना चांगल्या शिक्षण, रोजगाराचे आमिष दाखवून, फूस लावून नागपुरात आणले जाते. येथे त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी कबाडकष्ट करवून घेतले जाते आणि कोंडवाड्यात ठेवावे, तसे लहानशा खोलीत ठेवले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दलालांच्या रॅकेटकडून गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

गेल्या काही वर्षांत सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नागपूरचे नाव सर्वत्र चर्चेला आले आहे. येथे मोठ्या प्रमाणात रस्ते, पुल, ईमारतींची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे. त्यामुळे नागपुरात परप्रांतिय मजुरांचे दर आठवड्याला लोंढे दाखल होतात. अन्य प्रांताच्या तुलनेत त्यांना येथे चांगली मजुरी मिळते. बांधकामस्थळी काम करणाऱ्या पुरूषाला पाचशे ते सहाशे रुपये तर महिलेला चारशे ते पाचशे रुपये मोबदला मिळतो. त्यामुळे नागपुरात परप्रांतिय मजुरांसोबतच 'मोकाद्दम, मेटकरी' (मजूर आणि काम करवून घेणारांच्या मधला दलाल)ही तयार होत आहे. ही मंडळी ठिकठिकाणी मजूर पुरवितात. त्यांचा रोजची मजुरी किती द्यायची, हेदेखिल तेच ठरवितात. त्यातून प्रत्येक मजुरांवर त्यांना कमिशनच्या रुपात मोठी रक्कम मिळते. त्यामुळे ते त्या मजुरांच्या छोट्या छोट्या मुलांनाही कामावर जुंपतात. त्यांना मजुरीही कमी द्यावी लागते आणि धाकदपट करून जास्त वेळ कामही करवून घेता येते. हे लक्षात आले म्हणून की काय, अनेक दलालांनी एक रॅकेट तयार करून परप्रांतिय अल्पवयीन मुलांना नागपुरात आणून कामाला जुंपण्याचे तंत्र अंगिकारले आहे.यूपी, बिहारमधील बालकांची तस्करी

सूत्रांच्या माहितीनुसार, छत्तीसगड, एमपी, यूपी, बिहार, झारखंड, प. बंगाल, ओडिशासह ठिकठिकाणच्या बालकांना आणि त्यांच्या पालकांना हे रॅकेट फूस लावतात. मुलाला मोफत शिक्षण, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवितात. त्यामुळे गरिब पालकही आपल्या काजळाच्या तुकड्यांना या दलालांच्या हवाली करतात.कंपन्यात काम, कोंडवाड्यासारखी व्यवस्था

फूस लावून १२ ते १८ वयोगटातील मुलांना नागपुरात आणल्यानंतर हे दलाल त्यांना वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या कंपन्यां-कारखान्यात कामाला जुंपतात. त्यांच्याकडून भल्या सकाळपासून रात्रीउशिरापर्यंत काम करवून घेतले जाते. अविकसित भागात, खास करून झोपडपट्ट्यांमधील एखाद्या खोलीत ८ ते १० बालकांना येथे डांबल्यासारखे ठेवले जाते. जेवणासाठी दाल-चावल दिले जाते.