लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (जलालखेडा) : खेळता खेळता पाण्याच्या टाक्यात तोल जाऊन पडलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. अर्णव (अंशू) कैलास घोरपडे रा. खरबडी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. नरखेड तालुक्यातील खरबडी येथे शनिवारी सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.कैलास घोरपडे हे मुलगा आणि मुलीसह घरी टीव्ही पाहत होते. याचवेळी अर्णव बाहेर खेळायला गेला. यानंतर काही मिनिटांनी कैलास घोरपडे त्याला पाहायला घराबाहेर आले. अर्णव त्यांना अंगणात दिसला नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. परंतु तो दिसला नाही. यानंतर कैलास यांनी पाण्याच्या टाक्याकडे जाऊन बघितले असता अर्णव टाक्यात पडलेला दिसला. त्यांनी लगेच त्याला टाक्यातून बाहेर काढले व जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वेखंडे यांनी तपासणी दरम्यान त्याला मृत घोषित केले.
चिमुकल्याचा टाक्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 22:59 IST
खेळता खेळता पाण्याच्या टाक्यात तोल जाऊन पडलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. अर्णव (अंशू) कैलास घोरपडे रा. खरबडी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
चिमुकल्याचा टाक्यात बुडून मृत्यू
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरबडी येथील घटना