शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर ‘भूखंड’वार! २०० भूखंडांची न्यायालयीन चौकशी; विखेंच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 06:09 IST

आघाडी सरकारच्या काळातील २०० भूखंडाच्या व्यवहारांची न्यायालयीन चौकशीची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील कथित भूखंड गैरव्यवहाराचे घोंगडे विरोधकांच्याच अंगावर झटकून टाकले.

नागपूर : आघाडी सरकारच्या काळातील २०० भूखंडाच्या व्यवहारांची न्यायालयीन चौकशीची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील कथित भूखंड गैरव्यवहाराचे घोंगडे विरोधकांच्याच अंगावर झटकून टाकले.पृथ्वीराज चव्हाण, संजय निरुपम व काँग्रेस प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांनी कोपरखैरणे येथील भूखंड गैरव्यवहाराबाबत फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्याचे पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. कामकाज सुरू होताच विरोधकांनी भूखंड गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर गोंधळ सुरू केला.या आरोपांचा पलटवार करताना मुख्यमंत्र्यांनी दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या, असे सुनावून खोटे आरोप केल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आणि स्वत:च्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी नेत्यांना बोलण्याची संधी नाकारून अध्यक्षांनी कामकाज रेटले. त्या गोंधळात कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले.कांच के घर मे रहनेवाले...कांच के घर मे रहनेवाले दुसरों के घर पर पत्थर नहीं फेकते, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना सुनावले. हम कांच के घर मे नहीं रहते, असेही त्यांनी बजावले. बाबा, तुम्ही सज्जन आहात. आजूबाजूच्यांचे ऐकून आरोप करत जाऊ नका, असा माझा तुम्हाला सल्ला आहे, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना काढला.विखेंचे आव्हानकोपरखैरणेतील प्रकल्पग्रस्तांची १ लाख ८४ हजार चौरस फूट जमीन २ हजार कोटी रुपये किमतीची असून, ती साडेतीन कोटी रुपयांत बिल्डरांना विकण्यात आली. त्यात सत्ताधारी, अधिकारी व बिल्डरांचे संगनमत होते. एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर आरोप होताच त्यांचा राजीनामा घेतला गेला. मुख्यमंत्री महोदय! भूखंड विक्री व्यवहारात तुमच्या अखत्यारितील नगरविकास विभागावर आरोप झालेले असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्या, व्यवहार रद्द करा, असे आव्हानही विखे यांनी दिले.- विरोधकांच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी होईलच. पण सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विकण्याच्या रायगडसह राज्यातील २०० प्रकरणांची चौकशीही केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.आघाडी सरकारच्या काळात ६०६ हेक्टर जमिनीची विक्री याप्रकारे झाल्याचे सांगत फडणवीस यांनी ‘त्या’ व्यवहारांचे सातबाराच सभागृहात दाखविले.नवी मुंबईच्या भूखंडाबाबत विरोधकांनी केलेले आरोप निराधार आहेत. प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटण्याचा अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना होता. त्या अधिकारात त्यांनी वाटप केले. प्रकल्पग्रस्तांनी ते भूखंड बिल्डर वा इतरांना विकले. याा मंत्रालयातील मंत्री वा माझी भूमिका नव्हती. आघाडी सरकारपासूनच हे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाºयांना आहेत. त्यानुसार त्यांनी निर्णय घेतले. आघाडी सरकारच्या काळातील अशा २०० प्रकरणांचीही न्यायालयीन चौकशी केली जाईल. प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाचे नवीन धोरण लवकरच जाहीर केले जाईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस