शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सिंथेटिक ट्रॅकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ सप्टेंबरला लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:45 IST

कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात साकारलेल्या ४०० सिंथेटिक अ‍ॅथ्लेटिक्स ट्रॅकचे लोकार्पण येत्या १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.

ठळक मुद्देमहापौरांनी केली पाहणी : प. विभागीय अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेचे उद्घाटनही करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात साकारलेल्या ४०० सिंथेटिक अ‍ॅथ्लेटिक्स ट्रॅकचे लोकार्पण येत्या १६ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.४० वर्षे शहरात सिंथेटिक ट्रॅकची मागणी प्रलंबित होती. १० वर्षांपूर्वी सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम सुरू करण्यात आल्यानंतर, विविध अडथळ्यांमुळे खेळाडूंसाठी ट्रॅक उपलब्ध होऊ शकला नाही. येथे आयोजित दोन दिवसांच्या प. विभागीय अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेचे उद्घाटन आणि ट्रॅकचे लोकार्पण मुख्यमंत्री एकाचवेळी करतील. उद्घाटनासाठी दुपारी १.३० ची वेळ निश्चित करण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांच्या दौºयाआधी महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी सिंथेटिक ट्रॅकची पाहणी केली. त्यांच्यासमवेत क्र ीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, नागपूर जिल्हा अ‍ॅथ्लेटिक्स असोसिएशनचे सचिव शरद सूर्यवंशी, सदस्या अर्चना कोट्टेवार प्रामुख्याने उपस्थित होते.ट्रॅकशेजारी ड्रेसिंग रूम आणि प्रेक्षागॅलरीचे काम सुरूच आहे. या बांधकामाची देखील पाहणी महापौरांनी केली.पुण्यातील बालेवाडी स्टेडियमच्या धर्तीवर हा ट्रॅक बनविण्यात आल्याची माहिती रेवतकर यांनी महापौरांना दिली. अद्ययावत सुविधा असून फ्लड लाईटची व्यवस्था आहे. पाण्याचे स्प्रिंकल लावण्यात आले असून, पाणी ट्रॅकवर साचणार नाही, याचीदेखील काळजी घेण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यांचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती रेवतकर यांनी दिली.काही उणिवा दूर, काही कायम : सूर्यवंशीसिंथेटिक अ‍ॅथ्लेटिक्स ट्रॅकला इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ अ‍ॅथ्लेटिक्स फेडरेशनने(आयएएएफ)तांत्रिक मान्यता दिली आहे. आयएएएफने या ट्रॅकला ‘क्लास-२ सर्टिफिकेशन’ दिले आहे. दरम्यान, जिल्हा संघटनेने सिंथेटिक ट्रॅकची पाहणी केली होती. त्यांनी अनेक त्रुटी असल्याचे मीडियाला सांगितले होते. आज सूर्यवंशी यांना विचारणा केली तेव्हा ज्या त्रुटी स्थानिक स्तरावर दूर करता आल्या त्या केल्या, पण काही त्रुटी अद्यापही असल्याचे मान्य केले. ट्रॅक पूर्णपणे सज्ज झाला असे म्हणता येईल का, असा प्रश्न करताच त्यांनी केवळ स्मितहास्य केले.