शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री-फडणवीस एकाच मंचावर येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:47 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे १९ डिसेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : उद्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे १९ डिसेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रित करण्यात आले असून दोघेही उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या हस्तेच या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकारण तापले असताना एकाच मंचावर आल्यावर हे दोघे नेते काय भाष्य करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.‘कॅम्पस’जवळील ४४ एकर मोकळ्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २६ सप्टेंबर २०१५ रोजी याचे भूमिपूजन पार पडले. या वर्षी सप्टेंबर महिन्यात काम जवळपास पूर्ण झाले. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येथे प्रशासकीय कार्यालय स्थानांतरित करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र सरकार स्थापना न झाल्याने उद्घाटन रखडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री किंवा मोठ्या मंत्र्याला आमंत्रित करण्याचा विद्यापीठाचा मानस होता. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यपाल नागपुरात राहणार आहेत. त्या अनुषंगाने १९ डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते व्हावे असा दानदाते राहुल बजाज यांचा आग्रह होता. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रण पाठविण्यात आले. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा करण्यात आली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले असून दोघांनीही येण्याचे कबूल केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत, बजाज इलेक्ट्रीकल्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ