शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

मुख्यमंत्री फडणवीस-ओवैसी आज आमने-सामने

By admin | Updated: January 7, 2017 02:47 IST

जिल्ह्यातील नऊ नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे.

नागपूर : जिल्ह्यातील नऊ नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. नऊही नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असून या सर्वांमध्ये कामठी नगर परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामठी येथे शनिवारी (दि. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमआयएम (आॅल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन)चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा होत आहे. या दोन्ही सभांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. ऐनवेळी राजकीय समीकरणात बदलही या सभांनी होऊ शकतात. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी हा मतदारसंघ आहे. त्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपमध्ये काही काळ राहिलेले रणजित सफेलकर हे अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. भाजप - बहुजन रिपब्लिकन एकता मंच युतीकडून अजय कदम, काँग्रेसकडून शहाजहॉ शफाअत, शिवसेनेकडून राधेश्याम हटवार, भारिप बहुजन महासंघाकडून प्रमोद कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीकडून हेमलता पाटील, बसपकडून आशिष जाधव आदी उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यासोबतच एमआयएम (आॅल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन )कडून खालिद अन्वर मुख्तार अहमद हे निवडणूक मैदानात उतरले आहे. त्यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची शनिवारी (दि. ७) कामठीच्या रुईकर मैदान येथे सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यासोबतच भाजप - बरिएमंचच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कामठीत मुस्लिमबहुल मतदार आहेत. राजकीय समीकरण बदलविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. या दोन्ही सभेनंतर राजकीय समीकरण बदलले जाऊ शकते. अलीकडेच राज्यातील नगर परिषद निवडणुकीत अनपेक्षित यश मिळवून भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या पार्श्वभूमीवर या दोन्ही सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)