शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले : मुन्ना यादववर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:40 IST

सत्तेत असताना नागपूरचा तुम्ही विकास केला नाही आणि आता तो होत असताना पोटात दुखत असल्याने माझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डाव रचत आहात, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना ठणकावले. राज्यभरात गुन्हेगारी कमी झाल्याची आकडेवारीच त्यांनी सादर केली.

ठळक मुद्देमाझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डावराज्यातील गुन्हेगारीत घट झाल्याची दिली आकडेवारी

आॅनलाईन लोकमतनागपूर - सत्तेत असताना नागपूरचा तुम्ही विकास केला नाही आणि आता तो होत असताना पोटात दुखत असल्याने माझ्याआड नागपूरच्या बदनामीचा डाव रचत आहात, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना ठणकावले. राज्यभरात गुन्हेगारी कमी झाल्याची आकडेवारीच त्यांनी सादर केली.इतकी वर्षे नागपूरवर तुम्ही अन्याय केला. आता अखिल भारतात नागपूरला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असे सांगून, ‘मला लक्ष्य करण्यासाठी माझ्या शहराला लक्ष्य करू नका, असे आवाहन त्यांनी केले. कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री उत्तर देत होते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती नियंत्रणात आहे आणि ती उत्तम राखणे सरकारसाठी सर्वोपरी असल्याचे ते म्हणाले.नागपुरातील भाजपाचा नेता आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष मुन्ना यादव याला राजाश्रय असल्याचा आरोप करीत विरोधकांनी चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. आज उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले की, मुन्ना यादवच्या बचावाचे काहीच कारण नाही. गुन्हेगार असेल तर आज ना उद्या १०० टक्के कारवाई होणारच. आतापर्यंत कारवाईत पोलिसांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. ते स्वत:चा बचाव करतील. मुळात सध्याचा गुन्हा हा त्यांच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या मारहाणीवरून दाखल झाला आहे. त्यांना विरोधक कुख्यात गुंड म्हणतात पण त्यांच्यावर आधी दाखल झालेले गुन्हे त्या स्वरुपाचे नाहीत, असे ते म्हणाले. नागपुरातील गुन्हेगारी घटल्याचे सांगताना त्यांनी तिरपुडे इन्स्टिट्यूटचा अहवालही सभागृहात ठेवला. नागपूरची बदनामी विनाकारण झाली तर येणारी गुंतवणूक अन्यत्र जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.गुन्हेगारी घटल्याची दिली आकडेवारीएनसीआरबीचा अहवाल देत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हेगारी घटल्याची आकडेवारीच दिली, खून, दरोडा, दंगल, दखलपात्र गुन्हे, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार, महिलांचे अपहरण, बलात्काराचे प्रमाण आमच्या सरकारमध्ये तर दरवर्षी घटत आहेच पण आघाडी सरकारच्या तुलनेतही ते कमीच आहे, असे ते म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या सहातदेखील नाही. क्रमांक एकवर असल्याचा विरोधकांचा दावा फोलच आहे. गुन्हासिद्धतेचे प्रमाण आघाडी सरकारमध्ये १५ टक्क्यांवर कधीही गेले नाही. ते आज ३४.८ टक्क्यांवर गेले आहे. राज्य पोलिसांनी राबवलेल्या आॅपरेशन मुस्कान अंतर्गत २०११२ बेपत्ता मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.नगरसेवक सावंतविरुद्ध लावणार मकोकामुन्ना यादववरून मुख्यमंत्र्यांना घेरणारे माजी मंत्री राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक सचिन सावंत यांची आठवण करून देत चिमटा काढला. खून, खुनाचे प्रयत्न, गंभीर दुखापतीचे गुन्हे सचिन सावंतविरुद्ध दाखल आहेत. तो तुमच्या जवळचा आहे असे लोक म्हणतात. ‘आम्ही त्याला मकोका लावणार आहोतच, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. लोक म्हणतात म्हणून सावंत तुमच्या जवळचा ठरत नाही तसेच मुन्ना यादव माझा मतदारसंघ सांभाळतो वगैरेवर विश्वास ठेवू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.कोथळे मृत्यूप्रकरणी कारवाई निष्पक्षचसांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशी केली जाईल. कोणत्याही पोलीस कर्मचाºयाला पाठीशी घातले जाणार नाही. पाच पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.आगेप्रकरणी अपीलअहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी उच्च न्यायालयात सरकार दाद मागणार आहे. त्यासाठी नामवंत वकील शासन देईल. त्याबाबत नितीनच्या वडिलांशी आपली चर्चा झाली आहे. या हत्येप्रकरणी फितूर झालेल्या १३ साक्षीदारांविरुद्ध येत्या एक महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, असे ते म्हणाले.अश्विनी बिद्रेच्या जीवाचे बरेवाईट झाल्याचा संशयनवी मुंबईतील बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्याचा संशय पोलिसांना तपासामध्ये आलेला आहे, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. बिद्रे बेपत्ता झाल्यानंतरच्या तीन दिवसात त्यांच्या आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या मोबाईलचे लोकेशन एकच होते. बिद्रे यांच्या लॅपटॉपमधील मजकूर, व्हिडीओ कॉलिंगच्या तपासात कुरुंदकर आणि त्यांच्यातील संबंध निश्चितपणे प्रस्थापित होतात, असे मुख्यमंत्री म्हणाले.सोशल मीडियाच्या गैरवापरावर सरकार कारवाई करणारचदेव गायकवाड या व्यक्तीने मध्यंतरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध काही पोस्ट टाकल्या होत्या. प्रत्यक्ष तपासात ती व्यक्ती महादेव बालगुडे असल्याचे सिद्ध झाले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या पोस्ट शेअर करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या, त्यात एक पत्रकारदेखील होता. सोशल मीडियाचा गैरवापर दंगली घडविण्याच्या, सामाजिक अशांततेसाठी केला जात असेल तर कारवाई ही केलीच जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. बालगुडे हा बारामतीचा आहे आणि तो राष्ट्रवादीच्या शिबिरात होता म्हणून तो अजित पवारांच्या जवळचा आहे, असे समजण्याचे कारण नाही, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस