शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या मुख्यालयात दाखल, सरसंघचालकांशी करणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 22:06 IST

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस उलटले तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही.

नागपूरः विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस उलटले तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. अन्यथा आमच्याकडे पर्याय असल्याचा दावा करून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजपा सत्तावाटपात झुकतं माप देत नसल्यानं शिवसेनाही आक्रमक झाली आहे.राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. 'देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि संपूर्ण भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. तसेच राज्यामध्ये येत्या काही काळात भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन होईल,'' असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले असून, ते संघश्रेष्ठींशी या विषयावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे संघाच्या मध्यस्थीनं भाजपा-सेनेमधील सत्तावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे राज्यातील पेचप्रसंग सोडवण्याची विनंती केली आहे. शिवसेनेचे नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सल्लागार असलेल्या किशोर तिवारी यांनी नितीन गडकरी यांना दोन्ही पक्षांमधील तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. तसेच तिवारी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019