शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीश बोबडे यांचा शनिवारी नागपुरात जाहीर सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 23:58 IST

देशाच्या ४७ व्या सरन्यायाधिशपदी निवड झालेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा न्यायव्यवस्थेतील या सर्वोच्च बहुमानाबद्दल हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर आणि सर्व कायदेविषयक सदस्यांच्या वतीने शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार केला जाणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट बार असोसिएशनचे आयोजन : समारंभाला अनेक मान्यवरांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या ४७ व्या सरन्यायाधिशपदी निवड झालेले न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा न्यायव्यवस्थेतील या सर्वोच्च बहुमानाबद्दल हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर आणि सर्व कायदेविषयक सदस्यांच्या वतीने शनिवारी १४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार केला जाणार आहे.देशाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या हस्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली हा भावपूर्ण सोहळा होणार असल्याची माहिती हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गौरी वेंकटरमन यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर आणि उपाध्यक्ष अ‍ॅड. पी. बी. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशपदी निवड झाल्यानंतर न्या. बोबडे यांचा नागपुरात होणारा हा पहिलाच जाहीर सत्कार आहे. न्या. बोबडे यांच्या कार्यकर्तृत्वाशी नागपूरचे ऋणानुबंध जुळलेले असल्याने हा सोहळा भावपूूर्ण आणि हृद्य असेल, अशी भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. आर. के. देशपांडे आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. विकास सिरपूरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. या मुख्य पाहुण्यांसह मुंबई उच्च न्यायालयातील अनेक सन्माननिय न्यायाधिशांच्या तसेच औरंगाबाद व गोवा खंडपीठांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या सोबतच कायदेविषयक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनाही या समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.नागपूर हायकोर्टाच्या प्रांगणातील इमारत क्रमांक तीन समोरील मोकळ्या मैदानावर उभालेल्या शामियान्यामध्ये हा समारंभ होऊ घातला आहे. या समारंभाला होणारी मान्यवरांची गर्दी लक्षात घेता वाहनांची पार्किंग व्यवस्था आणि अन्य नियोजन कसे असेल, या संदर्भात प्रशासकीय पातळीवर आखणी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नागपूरकरांच्या दृष्टीने हा सत्कार सोहळा कौतुकाचा असून अभिमान जागविणारा आणि नागपूरचा सन्मान वाढविणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हायकोर्ट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह बारचे सर्व सदस्य या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत