शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:40 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी २७ एप्रिल रोजी नागपूर खंडपीठ येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अत्यावश्यक प्रकरणावर सुनावणी घेणार आहेत. न्या. धर्माधिकारी नागपूरचे सुपुत्र असून ते २७ एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी २७ एप्रिल रोजी नागपूर खंडपीठ येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अत्यावश्यक प्रकरणावर सुनावणी घेणार आहेत. न्या. धर्माधिकारी नागपूरचे सुपुत्र असून ते २७ एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत.न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी न्या. धर्माधिकारी यांनी नागपूर खंडपीठात अनेक वर्षे वकिली केली. १५ मार्च २००४ रोजी त्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठतेनुसार ते अनेक महिने नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती होते. दरम्यान, त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. तेथून त्यांची २० मार्च २०२० रोजी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांना विविध खंडपीठांना भेट देण्यास वेळ मिळाला नाही. या काळात त्यांनी प्रशासकीय सूत्रे सक्षमपणे सांभाळली. न्यायालयातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता त्यांनी गेल्या महिन्याभरात केवळ अत्यावश्यक प्रकरणांवर सुनावणी घेणे, सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे इत्यादी अनेक कठोर निर्णय घेतले. हायकोर्ट बार असोसिएशन व अन्य वकील संघटना मिळून न्या. धर्माधिकारी यांच्या सत्कारासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करणार होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. न्या. धर्माधिकारी सेवानिवृत्तीपूर्वी नागपुरात असल्यामुळे वकील संघटना साधेपणाने त्यांचा गौरव करणार आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर