शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, बाबासाहेब आयुष्यभर जनकल्याणाकरिता झटले : न्या. सुनील शुक्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:57 IST

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान कधीच विसरल्या जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंयुक्त जयंती कार्यक्रम उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान कधीच विसरल्या जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे कर्मचारी, सरकारी वकील कार्यालय, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी या तिन्ही महापुरुषांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. न्यायमूर्ती विनय देशपांडे, असिस्टंट सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर, मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, हायकोर्ट वेलफेयर कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शैलेश नारनवरे व हायकोर्ट मिनिस्टेरियल ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष व्ही. बी. फरकाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तिन्ही महापुरुषांची दूरदृष्टी आश्चर्यकारक होती. त्यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले. त्यांनी निर्माण केलेला आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. आपणही या महापुरुषांचे विचार अंगिकारून त्यानुसार वाटचाल केली पाहिजे, असे न्या. शुक्रे यांनी पुढे बोलताना सांगितले.तिन्ही महापुरुषांमध्ये दोन गोष्टी समान होत्या. त्यांनी गुलामगिरीची बंधने झुगारली व स्त्रियांचा आदर करणे शिकविले, असे मत न्या. देशपांडे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे मोकळी करून दिली तर, बाबासाहेबांनी या देशाला बळकट लोकशाही दिली, असे अ‍ॅड. किलोर यांनी सांगितले.तिन्ही महापुरुषांनी जीवनभर समाजातील कमजोर वर्गाला न्याय देण्याचे कार्य केले. हे कार्य करीत असताना त्यांनी परिणामांची तमा बाळगली नाही, अशा भावना अ‍ॅड. देवपुजारी यांनी व्यक्त केल्या. हे तिन्ही महापुरुष महाराष्ट्राचे सुपुत्र असून, आज त्यांचे नाव संपूर्ण जगात घेतले जाते. त्यांनी देशाचे राजकारण व समाजकारणाला दिशा दिली, असे अ‍ॅड. औरंगाबादकर यांनी सांगितले. फरकाडे यांनी स्वागतपर मार्गदर्शन, अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी प्रास्ताविक, हर्षा पाटील यांनी संचालन तर, दीप्ती दावडा यांनी आभार व्यक्त केले.अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांची जनसेवातिन्ही महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून जनसेवा करण्याचा संकल्प अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी यावर्षीही पाळला. त्यांनी वडील रामाजी व आई जिजाबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उच्च न्यायालयातील पक्षकारांसाठी १२ स्टील बेंचेस आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ३० स्टील खुर्च्या भेट दिल्या. यापूर्वी त्यांनी उच्च न्यायालयातील पोलीस चौकीला वॉटर कूलर भेट दिले होते. याशिवायही ते विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत राहतात.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती