शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रणजित देशमुख यांच्याविरुद्ध चालेल धनादेश अनादराचा खटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:58 IST

माजी मंत्री रणजित देशमुख यांच्याविरुद्ध विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात धनादेश अनादराचा खटला चालणार आहे. या न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून खटल्यावर स्थगिती देण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी विविध बाबी लक्षात घेता, ही याचिका खारीज करून देशमुख यांना दणका दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणका : विशेष जेएमएफसी न्यायालयात खटला प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मंत्री रणजित देशमुख यांच्याविरुद्ध विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात धनादेश अनादराचा खटला चालणार आहे. या न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून खटल्यावर स्थगिती देण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी विविध बाबी लक्षात घेता, ही याचिका खारीज करून देशमुख यांना दणका दिला.देशमुख व इतर संचालकांनी परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीकरिता अनेक गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतले होते. देशमुख यांनी १० फेब्रुवारी २०१६ रोजी सर्व कर्जदात्यांना त्यांची रक्कम परत देण्याचा निर्णय जारी केला होता. त्यानुसार त्यांनी रणधीर अशर यांना कर्जाच्या रकमेचा धनादेश दिला, परंतु तो धनादेश वटला नाही. त्यामुळे अशर यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली. त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. परिणामी, त्यांनी विशेष जेएमएफसी न्यायालयात खटला दाखल केला.जेएमएफसी न्यायालयाने २४ सप्टेंबर २०१६ रोजी देशमुख व इतर आरोपींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. त्याविरुद्ध देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपण कंपनीचे संचालक नाही. त्यामुळे खटल्यावर स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. तक्रारकर्त्याने बाजू मांडताना देशमुख यांनी कर्ज परत करण्याची ग्वाही दिली होती, असे सांगितले तसेच यासंदर्भात ठोस पुरावे असल्याची माहिती दिली. देशमुख यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर तर, अशर यांच्यातर्फे अ‍ॅड. कार्तिक शुकुल व अ‍ॅड. अभिलाष श्रीवास यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRanjit Deshmukhरणजित देशमुख