शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नई एक्सप्रेस नेली दोन किलोमीटर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 11:00 IST

नागपूर : धावत्या रेल्वेतून लहान भाऊ खाली पडला. मोठ्या भावाने रडतरडत सहप्रवाशांच्या मदतीने चेन पुलिंग केले. लोकोपायलटनेही माणुसकीचा परिचय देत गाडी दोन किलोमीटर मागे नेली.

ठळक मुद्देभरतवाडाजवळील घटना लहान भाऊ खाली पडला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या रेल्वेतून लहान भाऊ खाली पडला. मोठ्या भावाने रडतरडत सहप्रवाशांच्या मदतीने चेन पुलिंग केले. लोकोपायलटनेही माणुसकीचा परिचय देत गाडी दोन किलोमीटर मागे नेली. जखमीला गाडीत टाकले आणि नागपूरला आणले. वेळीच त्याला उपचार मिळाल्याने तो सुखरूप आहे. ही गंभीर घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपूरपासून २० कि.मी. अंतरावरील भरतवाडा रेल्वे स्थानकादरम्यान घडली.विकास रघुनाथसिंग (२१) रा. कन्नोज, उत्तर प्रदेश असे जखमीचे नाव आहे. विकास आणि त्याचा मोठा भाऊ राहुलकुमार (२४) दोघेही रोजगारासाठी घराबाहेर पडले. विकासला आई-वडील, तीन भाऊ आणि चार बहिणी आहेत. वडील मजुरी करतात. घरची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने विकास आणि राहुलकुमार विजयवाडा येथे काम शोधण्यासाठी निघाले होते. गुरुवारी ते गुरुसाहेबगंज रेल्वे स्थानकाहून निघाले अणि कानपूरला पोहोचले. कानपूरहून विजयवाड्याला जाण्यासाठी ते लखनौ -चेन्नई एक्स्प्रेसच्या जनरल बोगीने प्रवास करीत होते. दरम्यान विकासची प्रकृती बिघडली. भरतवाडा जवळ गाडी असताना विकास उलटी करण्यासाठी गाडीच्या दाराजवळ गेला. उलटी करीत असतानाच तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. ही माहिती सहप्रवाशाने राहुलकुमारला दिली. राहुलकुमार रडून सहप्रवाशांना चेनपुलींग करण्याची विनवणी करीत होता. तेवढ्यात सहप्रवाशांनी चेन पुलींग करून गाडी थांबविली. गाडीखाली उतरताच राहुलकुमार भावाकडे धावत सुटला. गाडीतील प्रवासीही खाली उतरले. लोकोपायलटला घटना समजताच त्यानेही माणुसकीचा परिचय देत गाडी दोन किलोमीटर मागे नेली. विकासला सहप्रवाशांच्या मदतीने गाडीत टाकून नागपुरात आणण्यात आले. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले.वेळीच मदत मिळाल्यामुळे विकासचे प्राण वाचू शकले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे