शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

चेल्याची गुरुवर कुरघोडी

By admin | Updated: May 17, 2015 02:48 IST

दोन वर्षांपूर्वी पोलिसांवर फायरिंग केल्यामुळे आणि त्यानंतर लखनादोन (मध्यप्रदेश) कारागृहातून पळून गेल्यामुळे सर्वत्र चर्चेत आलेला...

नरेश डोंगरे नागपूरदोन वर्षांपूर्वी पोलिसांवर फायरिंग केल्यामुळे आणि त्यानंतर लखनादोन (मध्यप्रदेश) कारागृहातून पळून गेल्यामुळे सर्वत्र चर्चेत आलेला खतरनाक गुन्हेगार राजा गौस हा कुख्यात गुन्हेगार सत्तू ऊर्फ सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता याचा गुरु‘भाई‘. राजाने जेल ब्रेकचे प्लॅनिग केले. मात्र, त्यात त्याने सत्तूला सहभागी करून घेतले नाही. मात्र, गुरुभाईच्या मनसुब्यांची चाहूल लागताच चेला सत्तूने ‘जेल ब्रेक‘चा समांतर कट रचला आणि गुरुवर मात करीत या कटाला प्रत्यक्षातही आणले. ३१ मार्चच्या ‘जेल ब्रेक‘चा मास्टर मार्इंड राजा गौस नव्हे तर सत्तू आणि बिशनसिंग उके होता, हे आता उघड झाले आहे.पोलिसांवर गोळीबार तसेच मध्यप्रदेशातील कारागृहासह अनेक ठिकाणच्या पोलीस कस्टडीतून पळून जाण्यात पटाईत असलेला राजा गौस हा प्रत्यक्षात धावू शकत नाही. त्याच्या एका पायात रॉड आहे. परंतू, त्याची क्रूरता लक्षात घेता कारागृहात त्याला त्याच्या साथीदारांपासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र, तो तेथेही भाईगिरी करायचा. मेव्हण्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला त्याने कारागृहातच बदडले. तेथूनच तो खंडणीही वसूल करायचा. कारागृहातून सुटका होणार नाही, हे लक्षात आल्यामुळे त्याने कारागृहातून पळून जाण्याचा कट रचला. भेटीला येणाऱ्या साथीदाराना त्याने पिस्तूल घेऊन बोलविले. व्हीजिटर रूममधून पिस्तूल हातात येताच तो आतमधून आणि त्याचे साथीदार प्रवेशद्वारावर गोळीबार करून पळून जाणार होते. २८ मार्चला या कटाची अंमलबजावणी होणार होती. मात्र, बरेच प्रयत्न करूनही व्हीजिटर रूममधून त्याच्या हातात पिस्तूल देणे त्याच्या साथीदारांना जमलेच नाही. त्यामुळे त्याचा कट हवेत विरला.दरम्यान, ‘गुरुभाई‘ च्या मनसुब्याची चाहूल सत्तू गुप्ताला लागली. मोठमोठ्या गुन्ह्यात साथ देऊनही राजा गौस एकटाच पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने आपल्याला सोबत घेण्याचे टाळले, हे लक्षात आल्यामुळे सत्तू अस्वस्थ झाला. त्याने राजा गौसवर कुरघोडी करण्यासाठी बिशनसिंग उकेला विश्वासात घेतले. या दोघांनी ‘जेल ब्रेक‘चा समांतर कट रचला. त्यात शिबू, नेपाली आणि आकाश ठाकूरला सहभागी करून घेतले. त्यानंतर राजाला अंधारात ठेवून हे पाच जण ३१ मार्चच्या पहाटे पळून गेले अन् त्यांनी कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली. बरॅकीतही सत्तूची दहशतजेल ब्रेक‘चा उलगडा करताना ‘आमच्या या कटाची राजा गौसला कल्पना नव्हती अन् त्याला काही कळू द्यायचे नाही, असे सत्तू आणि बिशनने सर्वांना सांगितले होते. त्यानुसार आम्ही बरॅक मधील अन्य कैद्यांनाही धाक दाखवला होता. गज कापताना अनेकांनी आम्हाला बघितले होते. पळून जातानाही अनेक जण जागे होते. मात्र, सत्तूच्या दहशतीमुळेच कुणी तोंड उघडले नाही. आमचा विरोधही केला नाही‘, असे शिबूने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. राजा गौसचा थयथयाटआपल्याला अंधारात ठेवून आपले नंबरकारी (चेले) पळून गेल्यामुळे खतरनाक राजा गौस कमालीचा संतप्त आहे. तो पहिल्या दिवशीपासूनच कारागृहात थयथयाट करीत आहे. ‘उनको छोडूंगा नही‘, असे त्याने अनेकदा कारागृहात वक्तव्य केल्याचीही कैद्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांची कस्टडी संपल्यानंतर कारागृहात राजा आणि त्याच्या नंबरकारीतच संघर्ष होण्याची शक्यता ‘भाई जगतातून ‘वर्तविली जात आहे.