शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:15 IST

सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडी एकाच भांड्यात तयार करण्याचा विश्वविक्रम करणार आहेत, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी विष्णू की रसोई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे१४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर होणार विश्वविक्रम

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडी एकाच भांड्यात तयार करण्याचा विश्वविक्रम करणार आहेत, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांनी विष्णू की रसोई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे, यासाठी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १४ आॅक्टोबरला एकाच भांड्यात तीन हजार किलोची खिचडी बनविणार आहेत. मैत्री परिवार संस्थेने नियोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. यात १४ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता खिचडी बनविणे सुरू होईल. दुपारी ३ वाजता उद्घाटन होईल. खिचडीसाठी ५०० किलो डाळ, ५०० किलो तांदूळ, ५० किलो तूप, ५० किलो तेल, ३०० किलो भाजी, गाजर ही सामुग्री वापरण्यात येईल. खिचडी बनविण्यासाठी ३,१२८ किलो क्षमतेची आणि १० फुटाची कढई कोल्हापूरचे इंजिनिअर नीलेश पै यांनी तयार केली आहे. तयार झालेली खिचडी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० दरम्यान नागरिकांना वितरित करण्यात येईल. या विक्रमासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड यांचे संमतीपत्र आले आहे. हा विक्रम पाहण्यासाठी १५ शाळांमधील विद्यार्थी, नागरिक हजेरी लावणार आहेत. डिसेंबर महिन्यात जळगाव येथे २५०० किलो वांग्याचे भरीत तयार करण्याचा रेकॉर्डही विष्णू मनोहर करणार असल्याचे प्रा. भेंडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके, विजय जथे, राजीव जयस्वाल, विजय शहाकार, निरंजन वासेकर उपस्थित होते.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर