शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ई-वे बिल तपासणी मोहिमेत ३९२ ट्रकची तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:15 IST

वस्तू व सेवा कर कायद्यानुसार ५० हजारांपेक्षा जास्त किमतीचा मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीसाठी ई-वे बिल १ एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आले आहे. नागपूर राज्यकर विभागाचे सहआयुक्त पी.के. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली २३ मे रोजी ई-वे बिल तपासणी मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देराज्य वस्तू व सेवा कर विभागाची मोहीम : २५ मेपासून राज्यांतर्गत ई-वे बिल अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वस्तू व सेवा कर कायद्यानुसार ५० हजारांपेक्षा जास्त किमतीचा मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीसाठी ई-वे बिल १ एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आले आहे. नागपूर राज्यकर विभागाचे सहआयुक्त पी.के. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली २३ मे रोजी ई-वे बिल तपासणी मोहीम राबविण्यात आली.केळवद येथील मोहिमेचे नेतृत्व राज्यकर उपायुक्त सुनील लहाने आणि मानेगाव येथील मोहिमेचे नेतृत्त्व राज्यकर उपायुक्त चंद्रकांत कछवे यांनी केले.या मोहिमेंतर्गत ३९२ वाहनांची आकस्मिक तपासणी करून वाहतूकदारांकडील ई-वे बिल व संबंधित कागदपत्रांची तसेच मालाची तपासणी करण्यात आली. मोहिमेचा उद्देश व्यापाऱ्यांनी व वाहतूकदारांनी आंतरराज्यीय वाहतुकीसाठी अनिवार्यपणे ई-वे बिल सोबत बाळगणे हा होता. या मोहिमेतून व्यापारी व वाहतूकदारांमध्ये ई-वे बिल प्रणालीविषयी जागरूकता वाढेल व कर चुकवेगिरीला आळा बसून महसुलात वाढ होईल, अशी आशा राज्यकर विभागाचे सहआयुक्त पी.के. अग्रवाल यांनी व्यक्त केली.१०० टक्के दंडाची तरतूदवाहतूकदारांना २५ मे २०१८ पासून राज्यांतर्गत वाहतुकीसाठीसुद्धा ई-वे बिल बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. ५० हजारांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची आंतरराज्यीय वाहतूक करतांना वाहतुकदारांकडे ई-वे बिल नसल्यास संबंधित व्यापाऱ्यांकडून मूळ कराची रक्कम व अधिक कराच्या १०० टक्के दंड तात्काळ वसूल करण्याची कायद्यात तरतूद आहे. कर व दंड भरणाऱ्या वाहतूकदारांना तसेच व्यापाऱ्यांना सदर मालाच्या जप्तीची कार्यवाही टाळण्यासाठी ई-वे बिल बाळगणे आवश्यक असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.अधिकाऱ्यांचा सहभागसदर मोहिमेत राज्य कर विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप बोरकर, मंगेश काटे, रवी बच्चेवार, राज्य कर अधिकारी किशोर कायरकर, प्रवीण भोपळे, मनीष साखरे तसेच राज्य कर निरीक्षक सुरेश मानकर, सुभाष जुमडकर, सुभाष धार्मिक, प्रशांत यादव, सतदेवे, मोहन जाधव, हरीश देवासे, सचिन वरठी, विशाल वाघ, अमित देऊळकर, मनीष मोटघरे, भूपेंद्र येवले, गिरीश बोबडे, डी.के. राऊत व कर सहायक महेश कर्णेवार यांनी सहभाग घेतला. 

  • - २५ मे २०१८ पासून महाराष्ट्र राज्यात अंतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल अनिवार्य.
  • - व्यवसाय सुलभता वाढविण्यासाठी सहज, जलद व सोपा मार्ग.
  • - १ एप्रिल २०१८ पासून आंतरराज्यीय मालवाहतुकीसाठी ई-वे बिल अनिवार्य.
  • - ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या माल वाहतुकीसाठी ई-वे बिल आवश्यक़
टॅग्स :GSTजीएसटीnagpurनागपूर