शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रजिस्ट्रीच्या नावाखाली गाळेधारकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 10:40 IST

गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ (म्हाडा)तर्फे गाळेधारकांना वैयक्तिक रजिस्ट्री करून देण्याची मोहीम राबविली जात आहे. बहुसंख्य गाळयांची लीज डीड (भाडेपट्टा करार)संपलेली असल्याने रजिस्ट्रीला कायदेशीर महत्त्व नसल्याने गाळेधारकांची फ सवणूक केली जात आहे.

ठळक मुद्देलीज डीड नसल्याने रजिस्ट्री अर्थहीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही प्रस्तावाला विलंब, नोंदीसाठी अडचण

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ (म्हाडा)तर्फे शहरातील बहुमजली इमारतीतील गाळेधारकांना वैयक्तिक रजिस्ट्री करून देण्याची मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून कायमस्वरूपी मालकी मिळणार असल्याने रजिस्ट्रीसाठी गाळेधारकांची धावपळ सुरू आहे. मात्र बहुसंख्य गाळयांची लीज डीड (भाडेपट्टा करार)संपलेली असल्याने लीज न वाढविता होत असलेल्या रजिस्ट्रीला कायदेशीर महत्त्व नसल्याने गाळेधारकांची फ सवणूक केली जात आहे.नोंदणीपत्रात मात्र याबाबतचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. म्हाडा कार्यालयाकडून गाळेधारकांना पाठविण्यात आलेल्या पत्रात रजिस्ट्री व लीज डीड नूतनीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र लीज डीड नूतनीकरण न करताच रजिस्ट्री केल्या जात आहे. गाळयाचे जमिनीसह संपूर्ण किमतीवर मुद्रांक शुल्क घेण्यात आले आहे. एकाच वसाहतीमधील गाळेधारकांच्या रजिस्ट्रीवर वेगवेगळे खसरा क्रमांक नमूद करण्यात आले आहे. अविभाज्य पट्टेदार हक्काबाबत कोणतेही उल्लेख करण्यात आलेले नाही. यामुळे नगर भूमापक कार्यालय वा महापालिका कार्यालयाकडे नामांतराची नोंद करताना अडचणी येत असल्याने गाळेधारांची कोंडी झाली आहे.तांत्रिक अडचणीमुळे रजिस्ट्री असूनही गाळेधारकांना बँकाकडून कर्ज मिळण्याला तसेच हस्तांतरण व विक्रीला अडचणी निर्माण होत आहे. जागेच्या मालकीहक्काबाबत रजिस्ट्रीवर कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याने रजिस्ट्रीनंतरही पूर्ण हक्क प्राप्त होत नसल्याने गाळेधारकांची कोंडी झाली आहे. विदर्भ हाऊ सिंग बोर्ड बहुमजली गाळेधारक कृती समितीचे अध्यक्ष गुलाबराव महल्ले व कोषाध्यक्ष अतुल सागुळले यांनी ही माहिती दिली.गाळेधारकांच्या समस्यांसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भीमनवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ होता.

गृहनिर्माण विभागाकडे प्रस्तावविदर्भ हाऊ सिंग बोर्ड बहुमजली गाळेधारक कृती समितीच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावर त्यांनी म्हाडाला तात्काळ सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गृहनिर्माण विभागाकडे सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ न व गृहनिर्माण विभागाच्या सचिवांशी चर्चा करून गाळेधारकांचा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल.- सुधाकर कोहळे, आमदार

टॅग्स :Governmentसरकार