शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:51 IST

लकी ड्रॉच्या नावाखाली शेकडो लोकांकडून रक्कम गोळा करून दोन भामट्यांनी शहरातून पळ काढला. काही दिवसांपासून या भामट्यांचे दुकान बंद आणि ते बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देशेकडो लोकांना गंडा फसवणूकीची रक्कम ९२ लाखांवरगिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकी ड्रॉच्या नावाखाली शेकडो लोकांकडून रक्कम गोळा करून दोन भामट्यांनी शहरातून पळ काढला. काही दिवसांपासून या भामट्यांचे दुकान बंद आणि ते बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.ज्ञानेश्वर नानाभाऊ मेटांग याने महालक्ष्मी लकी ड्रॉच्या नावाने गिट्टीखदान परिसरात अडीच वर्षांपूर्वी फसवणुकीचा गोरखधंदा सुरू केला. लकी ड्रॉच्या नावाखाली छोेटे दुकानदार, सर्वसामान्य नागरिकांकडून दर महिन्याला तो विशिष्ट रक्कम जमा करत होता. ही रक्कम गोळा करण्याची जबाबदारी मेटांगने अभिषेक बुरबुरे यांच्यावर सोपविली होती. दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला लकी ड्रॉ काढला जात होता. ती रक्कम संबंधित व्यक्तीला दिली जात होती. अनेक महिन्यांपासून लकी ड्रॉचा प्रकार सुरळीत सुरू असल्याने रक्कम गुंतविणारांची संख्या वाढत होती. गेल्या काही दिवसांपासून मात्र आरोपी मेटांग एकाएकी बेपत्ता झाला. त्याच्या पाठोपाठ बुरबुरेही गायब झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये कुजबुज सुरू झाली. लकी ड्रॉची तारीख निघून गेली तरी आरोपी मेटांग किंवा बुरबुरे त्यांच्या कार्यालयात दिसत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ निर्माण झाली. वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून अखेर गुंतवणूकदारांनी गिट्टीखदान ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार सतीश गुरव यांनी बुधवारी या प्रकरणी रामलाल बालराम कनोजिया (वय ५९, रा. अनंत नगर) यांच्या तक्रारीवरून मेटांग तसेच बुरबुरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला.सारेच गोलमालपोलिसांच्या माहितीनुसार, मेटांग या बनवाबनवीचा मुख्य सूत्रधार आहे. तो महिनाभरापासून बेपत्ता असून, तशी तक्रारही (मिसिंग) गिट्टीखदान ठाण्यात दाखल आहे. त्याने लकी ड्रॉ सुरू करताना शासनाची कसलीही परवानगी घेतली नव्हती. प्राथमिक चौकशीनुसार, आरोपींनी ९२ लाख, ३३ हजार, ५०० रुपये हडपल्याची माहिती पुढे आली आहे. हा आकडा वाढू शकतो. पोलीस मेटांग आणि बुरबुरेचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :fraudधोकेबाजी