शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

भक्त निवास बुकिंगच्या नावावर फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:04 IST

भक्तनिवासच्या ऑनलाईन बुकिंगच्या नावावर एका व्यक्तीची १ लाख ७ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील असून याप्रकरणी सदर पोलिसांनी सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यानंतर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भक्तनिवासच्या ऑनलाईन बुकिंगच्या नावावर एका व्यक्तीची १ लाख ७ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील असून याप्रकरणी सदर पोलिसांनी सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.श्याम रेवाराम रघुते (४८) रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, नंदनवन हे सिव्हील लाईन्स परिसरातील जीएसटी कार्यालयात नोकरीवर आहेत. ते कुटुंबासह कोकण पर्यटनाला जाणार होते. त्याची तयारी सुरूहोती. १५ ऑक्टोबर २०१८ रोजी कार्यालयात असताना त्यांनी मोबाईलवरून भक्तनिवास बुक करण्याकरिता मंगल रिसर्चवर माहिती सर्च केली. त्यात ०६२९००७७३४४ व ३२२३०४००४० हा नंबर मिळाला. त्यावर फिर्यादीने संपर्क साधला असता आरोपीने सांगितले की, ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स पेमेंट करावे लागेल. यासाठी आरोपीने आपल्या मोबाईलवरून एक लिंक पाठवली आणि ही लिंक ९२२३०४००४० या क्रमांकावर पाठवण्यास सांगितले. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या डेबिट कार्डची डिटेल माहिती भरून दिली. आरोपींनी ओटीपी नंबर मागितला. रघुते यांनी तो सुद्धा दिला. काही दिवसानंतर रघुते यांच्या आंध्रा बँकच्या अकाऊंटमधून २५,७०० रुपये व एक्सिस बँकेच्या अकाऊंटमधून १८,९०० रुपये डेबिट झाले. त्याचा मॅसेजसुद्धा आला. तेव्हा त्यांना संशय आला. पैसे परस्पर कसे निघाले याची माहिती काढत असतानाच ३१ ऑक्टोबर रोजी पुन्हा त्यांच्या खात्यातून ६२,४०० रुपये व्हीआयपी अ‍ॅपद्वारे ट्रान्सफर झाले. तेव्हा मात्र त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. सायबर सेलने आपल्या पातळीवर चौकशी केली. तेव्हा ऑनलाईन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. सदर पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी