शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लसणाची फोडणी स्वस्त! ठोक भाव ५० ते ७० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 20:25 IST

एका महिन्यापूर्वी किरकोळमध्ये १५० ते १६० रुपये किलोवर पोहोचलेले लसणाचे भाव सध्या आवक वाढल्याने ९० ते १०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात ५० ते ७० रुपये भाव आहेत, हे विशेष. भाव कमी झाल्याने लसणाची फोडणी स्वस्त झाली आहे.

ठळक मुद्देकळमन्यात तीन दिवसच बाजार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका महिन्यापूर्वी किरकोळमध्ये १५० ते १६० रुपये किलोवर पोहोचलेले लसणाचे भाव सध्या आवक वाढल्याने ९० ते १०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात ५० ते ७० रुपये भाव आहेत, हे विशेष. भाव कमी झाल्याने लसणाची फोडणी स्वस्त झाली आहे.तीन महिन्यांपूर्वी लसूण २०० ते २२० रुपये किलोवर गेला होता. जास्त पावसामुळे पीक खराब झाल्यानंतर आवक कमी झाली होती. भाव वाढल्यानंतर गृहिणींनी लसणाला स्वयंपाकघरातून दूर केले होते. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातून म्हणजेच छिंदवाडा आणि अन्य जिल्ह्यांतून कळमन्यात लसणाचे एक-दोन ट्रक दररोज येत आहेत. भाव कमी झाल्याने आवकीच्या तुलनेत विक्री वाढली आहे. नवीन उत्पादनाची आवक बाजारात सुरू होताच भावात घसरण होऊ लागली. पण सध्या आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. कळमना आलू-कांदे, लसूण अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, कोरोनामुळे प्रशासनाने आलू-कांदे आणि लसूण बाजार रविवार, सोमवार आणि बुधवार असे तीन दिवसच भरत आहे. त्या प्रमाणात आवक आहे. बाजार नियमित सुरू झाल्यास भाव कमी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार